मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

॥जय गजानन ॥


 ‼️जय गजानन‼️

माझी पूजा अपूर्ण आहे !!!


पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !

पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही , 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो ! 

पण त्या पांढर्‍या  रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो ! 

पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


रोज मी देवाजवळ दिवा लावतो ! 

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो ! 

पण संसारतापाने मंदपणे जळत असताना 

चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !

पण त्या कापराच्या  वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत , 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !  

पण माझ्या आजूबाजूच्या  माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही , 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो !

पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक  निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो ! 

पण माझ्या कष्टसाध्य  सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही , 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !* 


देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो ! 

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद  

परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही , 


*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*

स्वामी गजानन🙏🌹


मोहन सोमलकर 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

1 टिप्पणी:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...