शब्द माझे मुके झाले(पंचाक्षरी)
वाद संवाद
संपला आता !
शब्दच मुके
झालेले स्वतः !!
मैफिल बंद
हवाही कुंद !
शोधावे देव
देऊळ बंद !!
निरव शांत
स्मशान झाले !
कोलाहल तो
बोल मुकले !!
दु:खाचा सुर
जिथे तिथेच !
मुकेच शब्द
भाव सदाच.!!
भाव नयनी
नाही उरले !
स्नेहाचे दिप
सारे विझले..!!
शांत किनारा
![]() |
| मुके शब्द झाले |
समुद्र शांत !
मुक लाटाही
मुक प्रशांत !!
मोहन सोमलकर 🙏🏼

खुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे.
उत्तर द्याहटवाखूच छान सर...👌👍✍️
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌अतिशय सुंदर रचना केली सर
उत्तर द्याहटवा