मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

ऊर दाटूनी आला...!



 नागपूरचेच आम्ही रहिवासी 

प्रतिलिपीवरच भेट व्हायची 

भेट कधी तरी घ्यावी रंजुजीची 

मनात सदैव भावना दाटायची.!


पुष्कळदा प्रयत्न केला

योग कधी जुडून आला नाही 

आज वेळात वेळ काढला 

भेट झाली वेळचे भान राहिले नाही.!


मनसोक्त मारल्या गप्पा 

ऊर्मिला ताई आणि त्यांच्या मिस्टरांशी 

किती आपुलकी,जिव्हाळा, लळा दाखविला 

नाते जुडले भावनेचे ह्दयात शंभर अंशी..!


गप्पाचा टप्पा गाठत गेलो 

नुसते तिघेही बोलत राहिलो

मनात एकमेकाप्रति सलोखा वाटला 

आयुष्याच्या गप्पात रंगत राहिलो..!


काढला त्यांच्या घरातुनि पाय 

डोळ्यात अश्रु आले नाही

तरी अंतःकरण रडु लागले धायमोकळुन 

गहिवर फुटे मनास अजुन बोलायची इच्छा पुरी झाली नाही..!


रंजुताईची आज थेटभेट झाली..!

😊😊😊😊🔥😊🙏🙏🙏🍁🍁🍁

मोहन सोमलकर 🙏


९ टिप्पण्या:

  1. व्वा अतिशय सुंदर अगदी अविस्मरणीय भेट खूप खूप सुंदर🌺🌺🌺🌺🌺✍️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अरे वा
    खूप छान म्हणजे सुवर्ण योगच झाला हा तर ...!!
    खूप छान रचना केलीये आणि अशा भेटीचं
    तुम्ही केलेल सुंदर वर्णन वाचायला मिळाले....!!
    सुंदर लेखन आणि भावन तुम्ही व्यक्त केल्यात..
    आबा ... 🙏
    💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐

    उत्तर द्याहटवा
  3. तुमच्या लेखणीतून तुमच्या मनातील भाव समजले मोहन जी...खूप कमी लोक असतात आपलेपण जपणारी....सुंदर कविता लिहून व्यक्त झालात...छान👌👍✍️🍫🍫🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  4. काही का निमित्त होईना ,रक्ताची नाही पण मना भावाची नाती
    भेटन हे एक भाग्यच आहे.आणि तुम्हा दोन दिग्गज लेखकांची भेट
    झाली हे बघून खुप खुप आनंद झाला...
    तुम्हा दोघाना खुप खुप शुभेच्छा...
    💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...