मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

आबा

  1.  आबा
  2. आ  -----आई
  3. बा‐-------बाबा
  4. एक नाव ज्यात सामावलं सारं विश्व
  5. विश्व सारं काव्यपुष्पाचं 
  6. हसतं खेळतं एकमेकातं बहरतं 
  7. जिव्हाळ्याचं नातं फुलतं 
  8. प्रत्येक त्यांच्या कणाकणात शब्दरुपी काव्य सजतं 
  9. मन सजतं..!
  10. पारिजातकाचं अंगण बहरतं..!
  11. जपतो तो माणुस प्रत्येकाला आपला समजुन.!
  12. दिवसरात्र मेहनत करतो जीव ओतून.!
  13. पालवी स्नेहाची फुटावी,बहरावी 
  14. या आबारुपी वृक्षाला...!
  15. देव,गणेश,तुषारांचे वैभव मिळावे 
  16. फांद्या त्यांच्या बनुन रंजन व्हावे सर्वाचे.!
  17. कल्पना या प्रेमाची किती करावी....!
  18. जणु साऱ्या कवि-कवियत्रीची सरिता वाहत सुटावी
  19. मेघ शब्दाचा गरजावा..!
  20. पाऊसच साहित्याचा पडावा..!

  21. आबा काव्यपुष्प उभारण्यास अनेक अनेक शुभेच्छा.,!
  22. मोहन सोमलकर 🙏🍁🙏🍁🙏

८ टिप्पण्या:

  1. खुप...... छान रचना या रचनेला तोड नाही मोहन सर 🙏🏼🙏🏼

    गणेश शिवाजी दळवी

    उत्तर द्याहटवा
  2. मोहनजीऽ ...!!
    काय बोलू ?
    हे काव्य तर अप्रतिमच रचलय ...!!👌👌👌👌👌👌👌
    तुमच्या सगळ्यांचेच भरभरून प्रेम या जीवाला मिळतंय ते तर मी कधीच विसरणार नाही असेच आहे... !!
    प्रत्येक माणसाने आपल्याकडे जे आहे ते शेअर करत राहिल्यास परमेश्वर सुद्धा त्या कार्यात सक्रिय सहभागी होतो..आणि परमेश्र्वराचे दुसरं नाव आहे मैत्री... !!
    आणि मैत्री म्हणजे काय सांगावं ...!!
    ते तर साक्षात परमेश्वराशी जुळलेले अमृता सारखे एक गोड नातं असत...तिकडे कसलीच मोजदाद होऊ शकत नाही.. तुमच्या सगळ्यांच्या रूपाने परमेश्वरच मला भेटलेत.खूप प्रेम आणि जिव्हाळा मिळालाय आणि तुमच्या ह्या काव्याने मला निःशब्दच केलय...!!
    माझ्याकडे शब्दच नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
    🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...