🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩
🌻 *आनंदी पहाट* 🌻
*चंद्रपूरच्या महाकाली मंदिरातून*
*आजचा रंग..पांढरा*
*आजची नवदुर्गा..स्कंदमाता*
🌹⚜🌸🔆🙏🔆🌸⚜🌹
*षष्टीच्या दिवशी भक्तां आनंद वर्तला हो*
*घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो*
*मनात नित्य नूतन रंग फुलविणाऱ्या नवरात्रातील भक्तांना आनंद देणारा आजचा दिवस. ऋषी.. मुनी.. तपस्वींचा वारसा सांगणाऱ्या भारतात दैवतांमुळे हा देश एकसुत्रात बांधला गेलाय.*
*प्राताप्रांतात परस्परांविषयी प्रेम.. बंधुभाव.. आपुलकी, एकात्मता निर्माण झालीय. मग जम्मुकाश्मिरची वैष्णवदेवी असो वा कन्याकुमारी वा मदुराई, सगळे प्रांत भाषेचाही अडसर न येता या दैवतांमुळे हृदयाने जोडला गेलाय.*
*महाराष्ट्रातही अनेक प्रांतातून भक्त देवीच्या दर्शनास आंबेजोगाई, माहूर.. वणी.. तुळजापूरला.. चंद्रपूरला येतात. चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनाला परराज्यातून येणाऱ्या भक्तांची संख्या तर सर्वाधिक आहे. त्यामध्ये आदिवासींची संख्या तर फारच मोठी असते.*
*मानवी जीवनात शुभप्रसंगी जी रंगत सनई चौघड्याच्या सुरांनी येते तेवढीच रंगत येते ती संबळ आणि तुणतुण्याच्या सुरांनीही. त्याशिवाय मंगलकार्य संपन्नच होत नाही. ईश्वरकृपेने शुभकार्य निर्विघ्न संपन्न झाले की, कुलदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. देवाची आभाळमाया पुढेही आनंदी जीवन वाटचालीसाठी रहावी म्हणून 'जागर गोंधळ' घालतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने तुळजाभवानीचे, रेणूका आईचे आणि खंडेरायाचे मोठ्या प्रमाणात 'गोंधळी' आहेत.*
*'गोंधळ' हा भारतीय समाज जीवनाचा अविभाज्य घटक आहे. लोकसंगीताची ही मोठी देणगी. हवेहवेसे वाटणारे हे संबळ.. तुणतुणे यांचे सूर, पारंपारिक वेषातील.. खड्या आवाजातील त्या कवड्याच्या माळाधारींचा 'गोंधळ' हा आमचा सांस्कृतिक ठेवा.*
*मशालीची जळती पोत समोर ठेवून किंवा दिवटी ठेवत गोंधळ घालतात. नवरात्रात देवीच्या उपासनेनंतर या उर्जा देणारे शुभंकर पारंपरिक गोंधळ ऐकणे सुखावणारे. सर्वच देवतांना त्यासाठी घरी येण्याचे आवाहन केले जाते.*
*‼या देवी सर्वभूतेषु भ्रांन्तिरूपेण संस्थिता‼*
*‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼*
*जी देवी सर्व भूतमातांमध्ये भ्रांन्तिरुपात (आवरणशक्ति) आहे, त्या देवीला मी त्रिवार नमस्कार करतो. 🙏*
🔱🌸🔆🛕🌺🛕🔆🌸🔱
*_उधे ग अंबे उधे_*
*_उधे ग अंबे उधे_*
*_होऊ दे सर्व दिशी मंगळ_*
*_चढवितो रात्रंदिन संबळ_*
*_उधे उधे उधे उधे उधे उधे उधे_*
*_फुलवितो दिवटी दीपकळी_*
*_आम्ही अंबेचे गोंधळी !_*
*_आम्ही अंबेचे गोंधळी !_*
*_उधे ग अंबे उधे !_*
*_उधे ग अंबे उधे !_*
*_घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो_*
*_आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो_*
*_भवानी,भवानी, भवानी_*
*_बसली ओठी गळी_*
*_आम्ही अंबेचे गोंधळी !अंबेचे गोंधळी ! आम्ही अंबेचे गोंधळी !_*
*_उधे ग अंबे उधे !_*
*_उधे ग अंबे उधे !_*
*_सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो_*
*_दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो_*
*_घावली, घावली, घावली मूळमायेची मुळी_*
*_आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी_*
*_उधे ग अंबे उधे !_*
*_उधे ग अंबे उधे !_*
*_बोला अंबाबाईचा .. उधो !_*
*_रेणुकादेवीचा .. उधो !_*
*_एकवीरा आईचा .. उधो !_*
*_या आदिमायेचा .... उधो !_*
*_जगदंबेचा .... उधो !_*
*_महालक्ष्मीचा .... उधो !_*
*_सप्तशृंगीचा .... उधो !_*
*_काळुबाईचा .... उधो !_*
*_तुळजाभवानी आईचा .... उधो !_*
🌺🛕🌸🔱🌻🔱🌸🛕🌺
*गीत : शाहीर साबळे* ✍
*संगीत : अजय-अतूल* 🎹
*स्वर : अजय गोगावले* 🎤
*🎼🎶🎼🎶🎼* 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*११.१०.२०२१*
🌻🛕🔆🌸🌻🌸🔆🛕🌻
🌷💐🌷 मोहन सोमलकर 💐🌷💐
वाहहह...खुप सुंदर लिहीलय मोहनदादा...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाऊधे ग अंबे ऊधे..!!
धन्यवाद ताई
हटवाखुपच सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतिश
हटवासुंदर शब्दांविष्कार!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाउदे ग् अंबे उदो 🌹🙏🙏🙏
धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा।। जय अंबा माता ।।
उत्तर द्याहटवाउदो् ग् अंबे उदो...
🚩🙏🙏🙏
जय माता जी ������
उत्तर द्याहटवावा दादा अतिशय उत्कृष्ट असे लिखाण केलं तुम्ही आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती सुद्धा दिली शिवाय गोंधळ हा विषय माझा सुद्धा खूप आवडीचा विषय आहे अप्रतिमच 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई
हटवाअप्रतिमच 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाअतिशय सुरेख अगदी अप्रतिम लेखनशैली💐💐💐👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद दादा
हटवाखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना व लेखन
उत्तर द्याहटवा