| From my gallery |
आता खिडकीतून नव्हे अंगणातून
आभाळ पाहायची वेळ आली
संपला दसरा झाले चार दिवस
बघा ना उद्या कोजागिरी आली.!
ती दुनिया आमची निराली होती
मनात भरपूर चांदणे होते
जरी झोळी आमची स्वप्नाची रिकामी होती
नभात सांजेला नजर आशेची आरुढ होती
जीवनात नवा जोश,अंगात तरुणाई होती
डोंगरावर चढुन
खाली उडी मारण्याची ताकत मनात होती.!
कोजागिरी यायची तेव्हा
अख्खा वाडा आमचा आनंदाच्या वार्याने सजायचा!
२५ रु.ची वगॅणी गोळा करुन
रात्रभर कोजागिरीचा जल्लोष साजरा व्हायचा..!
मोकळ्या त्या अंगणात, आभाळी
गुलाबी, गार हवेतल्या थंडीत
गर्द गुलाबी रंगाचा शालु नेसुन
ती थंडी अंगात संचारायची.!
मग रात्री १२वाजेपयॅत
मोठ्या गंजात दुध आटवत
मराठी,हिन्दी गाणे मनात साठवत
आकाशी मोठ्या पांढराशुभ्र चंद्र यायचा बहरत.!
तेच खरे दिवस होते
खरा जीवनाचा आनंद द्यायचे
घरच्या माता,भगिनी भुलाबाईचे गाणे म्हणायचे.!
खिरापती मध्ये चने,चिवडा, जिलेबी, रेवड्याच्या गोळ्या मिळायच्या!
🌹मोहन सोमलकर 🌹
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतिश
हटवाजुन्या आठवणी जाग्या केल्यात मोहन दादा 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर , गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...👌👍💐
उत्तर द्याहटवाअगदी खरे आहे सर, अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाKhup sunder rachna 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा