मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

तोच चंद्रमा नभात...!

From my gallery 

 आता खिडकीतून नव्हे अंगणातून 

आभाळ पाहायची वेळ आली

संपला दसरा झाले चार दिवस 

बघा ना उद्या कोजागिरी आली.!


ती दुनिया आमची निराली होती

मनात भरपूर चांदणे होते

जरी झोळी आमची स्वप्नाची रिकामी होती 

नभात सांजेला नजर आशेची आरुढ होती 


जीवनात नवा जोश,अंगात तरुणाई होती 

डोंगरावर चढुन 

खाली उडी मारण्याची ताकत मनात होती.!


कोजागिरी यायची तेव्हा 

अख्खा वाडा आमचा आनंदाच्या वार्याने सजायचा! 

२५ रु.ची वगॅणी गोळा करुन 

रात्रभर कोजागिरीचा जल्लोष साजरा व्हायचा..!


मोकळ्या त्या अंगणात, आभाळी 

गुलाबी, गार हवेतल्या थंडीत 

गर्द गुलाबी रंगाचा शालु नेसुन 

ती थंडी अंगात संचारायची.!


मग रात्री १२वाजेपयॅत 

मोठ्या गंजात दुध आटवत 

मराठी,हिन्दी गाणे मनात साठवत 

आकाशी मोठ्या पांढराशुभ्र चंद्र यायचा बहरत.!


तेच खरे दिवस होते

खरा जीवनाचा आनंद द्यायचे 

घरच्या माता,भगिनी भुलाबाईचे गाणे म्हणायचे.!

खिरापती मध्ये चने,चिवडा, जिलेबी, रेवड्याच्या गोळ्या मिळायच्या! 



🌹मोहन सोमलकर 🌹



९ टिप्पण्या:

  1. जुन्या आठवणी जाग्या केल्यात मोहन दादा 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी बरोबर , गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...👌👍💐

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी खरे आहे सर, अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...