चंद्र
चंद्र हासरा लाजरा
भोवताली त्याच्या चांदण्या पिंगाघाली
जणु मुरलीधर मुरली वाजवी
गोपिका त्याच्या अवती-भवती साद घाली
अवतरले हे प्रेम सारे
भावनांनी बहरते
रात्रीचा शेला पांघरुनी
जेव्हा चांदणी आकाशी नाचते....
हे नयनरम्य दृश्य मनी साठवा
प्रितीचा भोवरा फिरतो आकाशी
दुधाचा गोडवा मनी साठवा
नाते स्नेहाचे वृध्दींगत करा मनी
चौफेर आहे चांदणे बरसले
प्रीतीचे जणु उडती आकाशी पाखरे
शरदाचं टिपूर चांदणे आज पडेल
सुशोभित होईल ही धरतीआणि वनचरे..!
मोहन सोमलकर 🙏
खुपच सुंदर..
उत्तर द्याहटवावाहहह...खुप सुंदर रचना....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद सवॅच लोकांचे
उत्तर द्याहटवाVva khup sundar apratim rachana 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर सर 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना सर👌👌👌
उत्तर द्याहटवा