जगाच्या पाठीवर आपला भारत देश असा एकमेव देश आहे. ज्याला बहुमूल्य अशी संतांची पंरपंरा लाभली आहे. ज्यांनी आपल्या मार्गदर्शक तत्वावर व समाजसेवी नितीमुल्याच्या आधारे मरेपयॅत या समाजाचे उद्बोधन केले.
व तळागाळातील दिन,दलित,व दुबळ्या लोकांना आधार देण्याचे काम केले.
संपुर्ण समाजाला समतेची व एकात्मतेची शिकवण दिली. अशाच संता पैकी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज त्र्येपनांवी पुण्यतिथी.
त्या निम्मित्याने हा लेख सादर करत आहो.
विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या सुवर्णमध्य ज्या ज्ञान सूर्याच्या तेजाने प्रखर होऊन भारतभूमीच्या मृतवत लोकांमध्ये चैतन्य व शक्तीचे, भक्तीच्या स्वरूपातून संजीवन पेरत आले, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानवतेचे थोर उपासक आणि अध्यात्म क्षेत्रातील विज्ञानवादी क्रांतिकारी संत होते .मानवतेचा संबंध हा मानवाच्या जगण्याच्या मूलाधार आहे. असे राष्ट्रसंत जनतेला सांगायचे आपला परिचय करून देताना राष्ट्रसंतांनी "मानवताही है पंथ मेरा, इन्सानियत हे धर्म मेरा ".
असाच करून दिला आहे. "इंसानही है देवता जो सत्य के पथ पर गया." असे ते "लहर की बरखा" या ग्रंथात लिहितात. मनुष्याला देवतांच्या उच्च अवस्थेला नेण्यासाठी मानवी मनाला सांगण्याचे काम तुकडोजी महाराजांनी केले. केवळ जण सुधारणेचा संदेश देऊन ते थांबले नाहीत. तर त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ या अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या आणि समाज जागृतीचे भान असलेल्या संत चारित्र्यशील राष्ट्रभक्त व मानवतेच्या सेवकांची रचनाबद्ध संघटना स्थापन केली.
"आधी केले मग सांगितले"
या न्यायाने त्यांची ग्रामगीता मानवी सुधार व मानवतेच्या मूल्यांवर आधारित आहे. मानवी वर्तनाचा पाया संस्काराने पक्का झाल्यास एक अहिंसक व मानवता प्रिय सदाचारी बुद्धिवंत माणूस किंवा सुजाण नागरिक घडवता येतो .यावर राष्ट्रसंतांचे समग्र तत्वज्ञान आधारभूत आहे आज देशाला सुजाण व विश्व मानवतेची समज असलेल्या मानवांची गरज आहे .असा न्यायक्षम सज्जन मानवांचा वर्ग म्हणजेच स्वर्ग आहे, यावर राष्ट्रसंतांचा विश्वास आहे हे सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी सामुदायिक ध्यान व प्रार्थना या अत्यंत सोप्या व वैश्विक उपासना मार्गाची निर्मिती केली.
" है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गासम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ".ही आर्जव त्यांनी जगदीश्वराला केवळ मानवतेच्या प्रेमातूनच केलेली आहे.
वंचित, दिन ,दुःखी ,कष्टी जीवांना होणारा त्रास राष्ट्रसंतांनी कधीही स्वीकारला नाही. देशाचे हे दुःख जणू त्यांच्या देहाला झालेली वेदना आहेत .असे मानूनच त्यांनी दिन, असाह्य जनतेच्या सेवेला प्रथम प्राधान्य दिले. दिन, दुःखीकष्टी ,पीडित व गरीब जीवांची सेवा हेच महापुण्य असल्याचे ते मानतात .म्हणूनच जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ही मानवतेची उपासना व राष्ट्रसेवा आहे .अशी शिकवण राष्ट्रसंतांनी दिली राष्ट्रांच्या सेवेसाठी अखंड झटणारे तुकडोजी महाराज हे खरेखुरे राष्ट्रसंत आहे. परत बंधाऱ्यात अडकलेला देश स्वतंत्र करण्यासाठी आपले स्वागत साधुत्वाची साकोरी बाजूला सारून देशाचा संसार करायचे सामर्थ्य या परमार्थी अवलिया कडे होते .
म्हणूनच देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने अलंकृत केले. केवळ आणि केवळ मानवता हीच तुकडोजी महाराजांची ओळख आहे. म्हणून त्यांचा महानिर्वाण क्षण व तो प्रयाण दिन सर्व संत स्मृती मानवता दिन .म्हणून पाळला जातो.
हे वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे 53 वे पुण्यतिथी वर्ष आहे. या कोरोना च्या जागतिक संकट काळात आपली मानवतेची बांधिलकी कायम ठेवत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारे रक्तदानाचे आवाहन केले आहे. मंडळाच्या देशभर असलेल्या 20000 शाखा या रक्तदान चळवळीत कार्यान्वित होत आहे
वंदनीय राष्ट्रसंतांनाही मानवता प्रेमी जनतेची स्मृती श्रद्धांजली ठरणार आहे. या मानवतेच्या थोर उपासक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र प्रणाम करुन मी माझे दोन शब्द संपवतो .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
जय हिंद जय भारत..!
॥ खरा तो एकची आहे धर्म ॥
॥ करा दिनदुबळ्यांची सेवा त्यातच नरदेहाचे मर्म ॥
मोहन सोमलकर 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩समाप्त🚩🚩🚩

खूपच सुंदर लेख....👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मानसीजी🙏🙏🙏🙏😊🚩
उत्तर द्याहटवाछान माहिती दिली आहे मोहन दा 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा
हटवासुंदर लेखन सरजी!👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर माहीतीपूर्ण लेख जगतगुरू तुकाराम महराजांबद्दल...तुकाराम महाराज म्हणजे भागवतधर्माचे कळस...संतशिरोमणी...वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अस म्हणत वृक्षांच महत्व पटवुन देणारे तुकाराम महाराज थोरच...त्यांच कार्य शब्दांत वर्णन करण्याच शिवधनुष्य लिलया पेललत तुम्ही....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप सुरेख लेख सुंदरच 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लेख लिहिला
उत्तर द्याहटवाउपयोगी लेख 👌👌 खूप माहिती कळली धन्यवाद 🙏🏻
उत्तर द्याहटवामाहितीपूर्ण लेख लिहिला 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख सर
उत्तर द्याहटवा