| From Gallery |
येते का त्या अंथाग सागराजवळ
परवा एकटाच गेलो होतो
खुप छान वाटे त्या जवळ येणाऱ्या लाटा
बसुन त्या किनार्यावर रममान झालो होतो
मधेच तुझी आठवण झाली
तुझ्या त्या मिश्किल हसण्याची
निवांत पणे सायंकाळी सुर्य मावळतीला
दोघे आपण सोबत असण्याची
होता तो सागरी किनारा शांत
कित्येक लोक एकांत घालवायला यायचे
जीवनाच्या कोलाहलापासुन दुर
शांत हातात हात घेऊन खरा आनंद लुटायचे
आता सागराचे त्याच आपण
दोन न मिळणारे किनारे आहोत...!
पण असेल वेळ थोडा तुला
आणि वाटत असेल काही तर मी तिथे वाट पाहतो

मोहन सोमलकर 🙏🏼💐
अप्रतीम रचना, ह्रदयस्पर्शी...सुरेख शब्दांकन...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवा