वात्सल्य, प्रेम,जिव्हाळा होता
बाबांना गाईबद्दल मनात रुजलेला
कुत्रे,मांजरी पाळण्यापेक्षा
गाईच्या घुंगराचा आवाज मनी भिणलेला
आणली होती गाय गावाहून
पांढरीशुभ्र नाव तिचे लक्ष्मी होते.!
डोळे तिचे पाणीदार दिसायचे
ती आली तशी शेण , दुधदुभत्याचे कमी नव्हते..!
पहाट झाली रोज की,
गळ्यातील घंटेचा आवाज दुमदुमायचा
तिच्या त्या श्वासाने,तिच्या असल्याने
सुख,शांती,मांगल्याचा नेहमीच झरा वाहायचा.!
सकाळी शेण उचलणे, तिच्यासाठी बाटा करणे
( गवत ,चुनीढेप, तिचे जेवण देणे)
लहानभावासोबत तिचे दुध काढणे
तिला पिरसवणे हे नित्याने करायचो
मग काढलेले दुध सारी भावंडे प्यायचो.!
मग दिवसभर ती बाहेर चरायला
आपल्या शाळेत तॄण खायला जायची
आम्हीही तिच्याशी बिछडुन
आपल्या शाळेत जायचो.....!
जसजशे आम्ही मोठे होत गेलो
जबाबदारी वाढत गेली, आम्ही गुंतंत गेलो
शहरातील आमच्या रहदारी वाढत गेली
तिला दिवसभर बाहेर सोडवायला जागा कमी पडली
तिने उपकार आम्हावर एवढे केले
तिच्या असेपर्यंत तिने आम्हांला चारपाच वासरु दिले
सदैव अंगणी आमच्या रोज तिच्यामुळे शेणाचा सडा पडत होता
दुध दुबत्याचा साठा घरात कधीच कमी पडत नव्हता.!
आमची ती कामधेनु लक्ष्मी मांगल्याची प्रतिक होती.
तिच्या दारात गोठ्यात असल्याने सुख, समृध्दीची हवा दरवळत होती.
दिवसेंदिवस शहरात सिमेंटची जंगले वाढली.
गुरे चारायला मोकळी मैदाने व वैरण कुठे राहिली.!
तिच्या पायाच्या खुरांना ही सिमेंटची रस्ते टोचत होती
प्रदुषणाच्या या वातावरणी तिची श्वासाची गती थांबत होती..
आम्हीही आता अभ्यासात भांवडे गुंतत गेलो..!
तिच्याकडे लक्ष द्यायला व तिची काळजी घ्यायला रिकामे नाही उरलो..!
बाबांनी कंटाळुन मग गावाला तिला परत पाठविले.!
मग आम्ही सारे तिच्या प्रेमासाठी मुकलो
दर दिवाळीला वसुबारसेला लक्ष्मीची आठवण करतो
एक पुरणपोळी नैवद्याची तिच्यासाठी काढुन
अप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाशुभ दिपावली!🪔🙏
शुभ दिपवाली ताई
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाखूप छान लहानपणी ची स्टोरी काव्य स्वरूपात सांगितली
धन्यवाद बिटीया
हटवाअतिशय सुंदर लिहलय सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखुपच छान लिहीलंय मोहन दा 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाVery Very Nice ...!
उत्तर द्याहटवाHappy Diwali to you and your Family...!
...!
वाहह..खुप सुंदर, ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा