मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

फुलासारखा दरवळतो तुझा स्मृतीगंध

 

My gallery 

जानु 💝तुझ्या नसल्याने निस्तेज वाटे
ति आपल्या अंगणातली बाग.!
पहाटे पहाटे उठल्यावर
तुझ्याच त्या गोड स्वप्नाने येई मला जाग !

तु नव्हती या दोन चार दिवसात तर

बहरुन आलेल्या त्या तुळसीला आला होता राग.!

फुले ती आपल्या छोट्याश्या बागेतील
गेली होती बहरलेली पटकन कोमूजुन!
हळुच मग कानात मला विचारायची
कारे आमची मालकिन गावाहुन आली नाही अजुन!

आज तु आलिया जानु माहेराहून घरला जशी
अंगणात पाऊल ठेवले जसे तु, गालात तुळस हसली कशी.!

तुषारच आनंदाचे अंगणी उडावे जसे.!
फिशपाॅट मधले मासे पाण्यात उडायला लागले तसे..!

घराचा तो कोपरा कोपरा तुझ्या येण्याने बहरला!
श्वास जसा तुझा या घरात आहे जसा भिनला !

 
वाटे जावे घरी लगबगीने लवकर
ओढ लागे मनी तुझी ,करिल जवळ कधी घर!

जसा आलो मी घरी दारात पाय ठेवले
तुझा फुलावानी फुललेला चेहरा पाहुनि मन हसले.!

वाटले मनी सारे काम सोडूनी बसावे तुझ्या जवळ
आजच सारे हितगुज करावे तुझ्याशी मनाने एकवटले बळ!

कळले मला जिच्या नसल्याने कोपरा कोपरा व्हावा सुना.!
मी तर मग तुझाच आहे सखा,मग मी कसा विसरु तुझ्या प्रितीच्या पाऊलखुणा!

मलाही आता बोलुदे तुझ्याशी
फुलासारखे मग बहरुदे बसु दे थोडे तुझ्यापाशी..!

🌹🥀🌹🪰🌹🪱🥀🌹🥀🪱

मोहन सोमलकर




९ टिप्पण्या:

  1. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली . 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍

    उत्तर द्याहटवा
  2. Waa घरची लक्ष्मी घरी नसेल तर अंगण ओस पडत किती छान लिहिले आहेत सर अप्रतिम रचना ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...