My gallery
आज त्याचा आहे दिवस आनंदाचा,
भाऊ माझ्या पाठचा मनाचा मोठा
सुख,आनंद यशाची कधी कमी नसावी
ह्दयी त्याच्या कोणाप्रती जिव्हाळ्या नाही तोटा.!
मेहनत करतो तो अपार
कष्टाचा डोंगर करतो तो पार
काट्यातुनि अनवाणी चालतो
डोक्यावर पेलतो कुटुंबाचा भार..!
दिया आणि अंतरा या दोन लेकी
त्याच्या पोटी आहे जन्मल्या..!
चेहर्यावर त्यांच्या विद्या व समृद्धी नांदते
मला वाटे जणु लक्ष्मी व सरस्वतीच आल्या.
सुखाच्या त्याच्या जीवनात असाच
वाहिल सदैव अमृताचा झरा
सदैव आयुष्य सुखाचे जावो त्याचे
शांततेचा जीवनात मिळो त्याला आसरा!
माझ्या किशोर या लहान भावास
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा🍫🍫🍫🌾
💐💐💐💐🍦🥟🍬🍧🥧🍫🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖
मोहन सोमलकर व परिवार
शुभेछुक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.