मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

शुरा मी वंदिले..!

 


शुरा मी वंदिले....!

My gallery 



मायुभू साठी प्राण तु अर्पिले,शुरा मी वंदिले॥धॄ॥

एका मायेच्या पोटी जन्मुनी, दुसर्‍या मायेसाठी प्राण आपुले पणाला लाविले
इतके बळ सैनिका! तुला कोणी रे दिले
मायभूसाठी प्राण तु अर्पिले,शुरा मी वंदिले॥१॥

स्वातंत्र्य्यासाठी कित्येकांनी हाडाची काडे केली.!
दिवसभर कष्ट उपसले,रात्र जागली
सभा घेतल्या,उपोषण झाले
कित्येक शुर विरांचे तुम्हासारखे रक्त सांडले
मायभूसाठी तु प्राण पणाला लाविले,शुरा मी तुला वंदिले॥२॥

देशासाठीच तुझ्या मनात मान दडला
देशासाठीच तुझा अभिमान फडफडला
देशासाठीच तु आयुष्य आपले जगले
मायभू साठी प्राण पणाला लाविले,शुरा मी वंदिले॥३॥

देह झिजविला ,नाही केले हेवे दावे
पोलादी छाती तुझी,ऊरी भव्य स्वप्न बाळगले
ध्येय, उद्दिष्ट, स्वप्न देशासाठीच पाहिले
मायभू साठी तु प्राण अर्पिले,शुरा मी तुला वंदिले॥४॥

मरणाची नव्हती चिंता,नेत्रात दिसे स्वताची चिता॥
झेप शत्रुवर अशी टाकली,जणु होता तु चिता
मशाल देशभक्तीची घेऊनी पाऊल तुझे सरसाविले.!
मायभुसाठी प्राण हसत आपले अर्पिले , शुरा मी तुला वंदिले॥ ५॥

मोहन सोमलकर
🙏🌺🌼🙏🌺🌼🙏🌺🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳




९ टिप्पण्या:

  1. अगदी खरं आहे....देशाच्या सीमा सुरक्षावर लढणारे शुर सैनिक कसलाच कोणताच भेदभाव हेवेदावे न करता फक्त आणि फक्त देशासाठी लढतात....मानाचा सलाम शुरवीरांना..🙏🏼🙏🏼
    सर तुम्ही खूप छान अप्रतिम लिखाण करता... ✍️✍️🙏🏼🙏🏼👌👌👌

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...