शुरा मी वंदिले....!
My gallery

मायुभू साठी प्राण तु अर्पिले,शुरा मी वंदिले॥धॄ॥
एका मायेच्या पोटी जन्मुनी, दुसर्या मायेसाठी प्राण आपुले पणाला लाविले
इतके बळ सैनिका! तुला कोणी रे दिले
मायभूसाठी प्राण तु अर्पिले,शुरा मी वंदिले॥१॥
स्वातंत्र्य्यासाठी कित्येकांनी हाडाची काडे केली.!
दिवसभर कष्ट उपसले,रात्र जागली
सभा घेतल्या,उपोषण झाले
कित्येक शुर विरांचे तुम्हासारखे रक्त सांडले
मायभूसाठी तु प्राण पणाला लाविले,शुरा मी तुला वंदिले॥२॥
देशासाठीच तुझ्या मनात मान दडला
देशासाठीच तुझा अभिमान फडफडला
देशासाठीच तु आयुष्य आपले जगले
मायभू साठी प्राण पणाला लाविले,शुरा मी वंदिले॥३॥
देह झिजविला ,नाही केले हेवे दावे
पोलादी छाती तुझी,ऊरी भव्य स्वप्न बाळगले
ध्येय, उद्दिष्ट, स्वप्न देशासाठीच पाहिले
मायभू साठी तु प्राण अर्पिले,शुरा मी तुला वंदिले॥४॥
मरणाची नव्हती चिंता,नेत्रात दिसे स्वताची चिता॥
झेप शत्रुवर अशी टाकली,जणु होता तु चिता
मशाल देशभक्तीची घेऊनी पाऊल तुझे सरसाविले.!
मायभुसाठी प्राण हसत आपले अर्पिले , शुरा मी तुला वंदिले॥ ५॥
मोहन सोमलकर
🙏🌺🌼🙏🌺🌼🙏🌺🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

अतिशय सुंदर रचना केली दादा👌👌🙏
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई
हटवाअगदी खरं आहे....देशाच्या सीमा सुरक्षावर लढणारे शुर सैनिक कसलाच कोणताच भेदभाव हेवेदावे न करता फक्त आणि फक्त देशासाठी लढतात....मानाचा सलाम शुरवीरांना..🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासर तुम्ही खूप छान अप्रतिम लिखाण करता... ✍️✍️🙏🏼🙏🏼👌👌👌
जय हिंद, खुप धन्यवाद मॅम
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन
हटवाधन्यवाद सचिन
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना... अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान रचना केली आहे ...
उत्तर द्याहटवा