मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

साहित्यातील सहा रत्न

My gallery 

नात्याची विन सदा घट्ट केली •••••••••••••••••••••••••••• प्रतिलिपी एक व्यासपीठ आहे. विचाराच्या देवाणघेविणीचं, एक शाळा आहे दहादिशातुन एकत्र येऊन, एका झेंड्याखाली लिखाण करण्याचं,छान छान साहित्य वाचण्याचं जगातलं मोठं भव्यदिव्य वाचनालय आहे. मित्रांनो,भावांनो व माझ्या बहिणींनो ••••••••••••••••°°°••••••••••••••°• मी या लेखात जास्त पाल्हारा न लावता थोडक्यात उरकत घेतो. गेल्या दोन ते अडीच वर्षांच्या काळात मला कित्येक साहित्यिक प्रतिलिपीवर लाभले ,ज्यांनी मला भरभरुन प्रेम दिलं. ज्यांच्याशी माझ्या मनाचं एक अकल्पित नातं जुडलं. त्या नात्याची विण मी घट्ट करुन ठेवली आपल्या मनात. ती विण कधीच कुठूनही उसवु दिली नाही. जेवढे लेखक,कवि,कवियत्री,लेखिका माझ्या वाचनात आले ते सर्वच माझ्या मनाशी बिलगलेले आढळले. सर्वच मला वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा देणारे मिळाले. मी कुणाशी कुणाबरोबर तुलना करुन मन दुखावणार नाही. पण या प्रतिलिपीवर मला माझ्या मतानुसार काही विभुती आधारस्तंभ, मार्गदर्शक,विचारवंत, विनोदवीर, खळखळुन हसवणारे,प्रशसंक, विद्याव्यासंगी, गाढेअभ्यासक, विषयाचे सखोल ज्ञान असलेले,तंत्रज्ञानात सर्वतोपरी परीपुणॅ, अध्यात्मिक ज्ञानाची पातळी उंचावलेले, प्रेमळ, सोज्वळ, समजुन घेणारे वाटले. त्या विभुतींना माझा विनम्र प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 वयोवृद्ध मालाताई सबनीस आजी 🍂••••••••  ••••••••••••••••••🍂 वंदनिय माला सबनीस आजी प्रतिलिपीवरील वयोवृद्ध लेखिका,कवियत्री असल्यातरी, त्यांनी त्यांच्या नजरेतून खुप तिन्ही ऋतु पाहिले. व ते त्यांच्या कवितेतून व लेखातुन दिसते, सदा प्रेमाने पाठीवरून हात फिरविणारी मालाताई सबनीस आजी माझ्या आजीसमानच वाटली.त्यांना माझा प्रणाम🙏🍂  दुसरे श्री. दत्ताभाऊ जोशी.. ••••••••••••••••••••••• दत्ताभाऊ जोशी सरांना मी प्रतिलिपीवरले पु ल. देशपांडेच समजतो. कधी त्यांना विनोदवीर, कधी विनोदाचे बादशहा,कधी त्यांना स्टॅन्ड अप काॅमेडीमॅन ही उपाधी देतो. त्यांच्या कोणत्याही लिखाणात तुम्हाला विनोदरस, श्रृंगाररस, करुणा,भयरस, रोमांच,सामाजिक, व्यक्तिचित्रण, चरित्र लेखन,व्यंग असे नवरस वाहतांना सदैव दिसते. मला जर कुटूंबाचा गाडा खेचण्याची जबाबदारी नसती ,आणि माझ्या बाबादादांची संपत्ती जतन केलेली मिळाली असती, आणि मी त्या संपत्तीचे उपभोग करणारा एकुलता एक वाली असतो तर, चोविस तासातुन वीस तास तर दत्ताभाऊ जोशी सरांचे मनोरंजन पर, विनोदी, मार्गदर्शक साहित्य वाचत बसलो असतो ,एवढे मला प्रिय आहे ते,. या महामहिम लेखकांनी त्यांच्या लिखाणातुन खास करुन " वेड्याची जत्रा व सरस्वतीच्या लेकी" या सदरातून नात्याची विण घट्ट केली आहे,उसवु दिली नाही. यांना माझा सलाम 🍁🍂🍁🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍂🍁 ३) श्री. दत्ताभाऊ सावंत सर  श्री. दत्ताभाऊ सावंत सर यांच्या बद्दल काय सांगावे ,फार मोठे व्यक्तीमत्व आहेत ते प्रतिलिपी मार्फत अश्या दुर्मीळच रत्नाची भेट व्हावी, हे मी माझे खुप मोठे भाग्य समजतो. तुम्ही कधीही या व्यक्तीला फोन करा. त्यांनी उचलला नाही तर म्हणा. कितीही कामात असु द्या. आपल्या प्रेमळ वाणीने आत्मीयतेने विचारपूस करणारे हे व्यक्ती म्हणजे मधमाश्यांचं तिसरं पोळच होय. मराठीचे गाढे अभ्यासक,समिक्षक,व्यासंगी, प्रशंसक, उत्तम टीकाकार,पत्रकार, विषयाचे सखोल ज्ञान असलेले,प्रतिलिपीवरील एकही चर्चासत्र न सोडणारे,चर्चासत्र गाजवणारे,प्रत्येकांच्या प्रश्नाला उत्तर देणारे,सहभाषीक, भरपुर देशाचा दौराकरुन तेथील भाषा संस्कृती,आदानप्रदान, याची माहिती गोळा करणारे, जगभ्रमक, किती देशाचा दौरा केला त्यांनी हे माहित नाही. बहुतेक १४ देश हा आकडा माझ्या आठवणीत आहे. सावंत सराशी माझी प्रत्यक्ष भेट नाही,पण दोनदा मी फोनवर बोललो. बर वाटले,साक्षात जेजुरीचे खंडोबा राया बोलत आहे असे वाटले. हिवाळ्यात दोन वर्षापुर्वी नागपुरात हिवाळी अधिवेशनात येऊ तेव्हा भेटु घेऊ असे बोलले, पण करोनामुळे साध्य झाले नाही. श्री. दत्ताभाऊ सावंत बारामतीचे भुषण आहे. एक शेतकरी म्हणुन सर्वाना सांगतात. खुप सामाजिक चळवळीत अग्रेसर आहेत. त्यांच्याबद्दल बोलले तेवढे कमीच आहे. मी लिहले ते पंचवीस पैसेही नाही. प्रतिलिपीवर गाजलेले साहित्य १)भगवान बाबा २)बालपणीचे मित्र...विश्वास नागरे पाटिल.! ३)१५ जुनची ती रात्र, भारतीय लष्कराचा रुद्र अवतार.! ४)कलंक ५)महिला पोलीस अधिकारी अश्विनीची हत्या,मृतदेहाचे तुकडे फ्रिज मध्ये ठेवले. ६)वासनाप्रेम ७)झिमाबाई ८)अभिनव काॅलेज मधील सैतान "पुण्यातील पाशवी हत्याकांड पाच भाग..! इत्यादी अनेक गाजलेले साहित्य, अजुन आहेत. सोनेरी लेखणी आहे सरांची एक बारामतीला छान अनाथ मुलांसाठी आश्रमशाळा सर चालवितात . जी आश्रमशाळा त्यांचे थोरले बंधु चालवित होते. जे स्वर्ग वासी झाले. सरांचा कयास होता प्रतिलिपीवरील लोकांचे भव्यदिव्य गेट टुगेदर करायचे म्हणून, पण कोरोनामुळे मागे पडले. या तिसऱ्या मौल्यवान रत्नाला माझा प्रणाम 🍁🥀🙏🙏🙏🙏🙏🥀🍂🍂🍁  चौथे रत्न ४) श्री. तेजय लिमये सर श्री. तेजस लिमये सरांन बद्दल काय बोलावे. जेवढे बोलले तेवढे कमीच आहे. कोणत्याही विषयावरचे सखोल ज्ञान,खुप जिज्ञासु, प्रशंसक, संस्कृतचे व्यासंगी,अध्यात्मिकतेबद्ल सखोल अभ्यास कविता व लेख,कथा उत्तम लिहिणारे, शैलीदार लिखाण, मराठी विषयाचे दांडगे अभ्यासक, प्रेमळ भाषिक, चेहराच त्यांचा सुर्याचे तेज वाटणारा वाटतो. पाककलेत निपुण, शब्दाचे धनी , खुप काही गुणसंपन्न.! नात्याची विण घट्ट करणारे..! चौथे रत्न यांना माझा प्रणाम 🙏🍁🍂🍁🙏🥀🍁🍂🙏  पाचवे रत्न श्री.चंद्रकांत दादा येवला सर येवलासरांबद्दल काय बोलु ,खुप प्रेमळ आहेत सर .. ! अहमदनगर ला राहतात. असा एकही व्यक्ती नसेल ज्या व्यक्तीला त्यांनी कवितेबद्दल कसे लिहायचे ते ज्ञान दिले नाही . सर्वाना जिथे चुकत आहे,तिथे मार्गदर्शन करणारे ,योग्य रितीने समजुन सांगणारे,अभ्यासु व्यक्तीमत्व आम्हाला लाभले. प्रत्येक कविता प्रकाराचे जाणकार, नविन साहित्यिकांच्या डोक्यावर मार्गदर्शनाचा हात ठेवणारे. असे मार्गदर्शक येवला सर प्रतिलिपीवर शोधुन सापडणार नाही . सर्वाना योग्य समिक्षा देतात.त्यांना माझा प्रणाम 🙏🍂🙏🍂🍁🙏🥀 सहावे रत्न आमचे लाडके काव्यपुष्प या समुहाचे जनक सवाॅचे प्रेरणास्रोत, यंगस्टार ब्रिगेटचे चीफ..! सगळ्यात उत्फुरतॅ कार्यकर्ता. सगळ्यांना एका श्रृंखलेत बांधुन ठेवणारे. सगळ्यात तरुण जोश दाखविणारे सक्रिय व्यक्तीमत्व म्हणजे One and Only Presenting you ६)Mr. Aba * सतिशजी सहेर सर  सगळ्याचे लाडके आबा या व्यक्तीमत्वाने आपला स्वतःचा असा स्वार्थ बाजुला ठेवुन सगळ्यांच्या भल्यासाठीच "काव्यपुष्प " हा ब्लाॅग तयार करुन गुगल माफॅत आपली इमेल id तयार करुन लिंक जोडुन साहित्य लिहिण्याचा एक ग्रुप तयार केला ज्यात ५० सभासद सक्रीय आहेत. ब्लाॅग वर साहित्य जसे कविता, कथा,लघुनिबंध, लघुकथा ,अलक लिहुन आपले फॉलोअर्स व व्युअरस जमा करणे व आपले साहित्य नावरुपास आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम आबांनी केले. असे दुर्मीळच व्यक्तीमत्व लाभणे म्हणजे लोखंडाला परिस लागणे होय. आबांना माझा प्रणाम 🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🙏🙏 या सहाही रत्नांना मी भेटुन खुप खुप आनंदी व त्यांचा ऋणी झालो. ज्यांनी आपली नात्यांची विण कुणासोबत ही उसवु दिली नाही, कुठे काही चुकले असेल तर या पामराला माफ करावे. त्यांच्या इतकी क्षमता माझी नाही ,पण त्यांना या लेखात मला गुंफण्याचे जे भाग्य मिळाले. ते मी माझे नशिब समजतो. व मी माझ्या मुलीचेआणि माझ्या सौ चे खुप धन्यवाद मानतो ज्यांनी मला २ तास ४५ मिनिट काहीही व्यत्यय न आणता लिहु दिले,व माझ्या मागे अथवा समोर काहिही कुरकुर केली नाही. त्याबद्दल त्यांचे शतश धन्यवाद.🙏🥀🙏🥀🙏🥀🥀🥀🙏🥀🥀🙏 धन्यवाद सवाॅचे.  🙏🥀🙏🥀🙏🥀🙏 धन्यवाद मित्रांनो

११ टिप्पण्या:

  1. किती भरभरून कौतुक केले आहे सर सगळ्यांच.... खरंच खुप सुंदर अप्रतिम लेख लिहिला आहे... तुमचही खुप कौतुक आणि प्रणाम तुमच्या लिखाणाला.... 🙏🏼🙏🏼✍️✍️✍️👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. फारच सुंदर सहाही रत्न ��������

    उत्तर द्याहटवा
  3. वाहहह..खुप सुंदर शब्दांत अवलोकन केल आहे सर्वांच्या कार्याच...लेखनाच...मस्त लिहीलय मोहनदादा...अप्रतीम...या सर्व मान्यवरांच्या पंगतीत एका नावाची कमी भासतेय...ते म्हणजे आम्हा बहीणींचे लाडके बंधु....मोहन सोमलकर दादा ..💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  4. Hello..!
    क्या बात है...!!
    मुरली मनोहर मोहन जीऽ..!!
    खूपच छान 👌 मन आणि हृदय भारावून गेलंय.
    तुमच्या रसाळ प्रेमळ शब्दांचा वर्षाव झाला आणि जणू अभ्यंग स्नानच झाले; असेच मला वाटले.तुमच्या प्रेमळ जिव्हाळ्याच्या आपुलकीच्या शब्दांमुळेच तुम्ही सदोदितच आमच्या हृदयात एक वेगळच स्थान निर्माण केलंय. आम्हीच नाही; तर लिपी परिवारातील अनेकजण तुमच्या शब्द रूपी आपुलकी प्रेम-जिव्हाळ्याचा परीस स्पर्ष होऊन जीवाचे जिवलग मित्र तुम्ही केव्हाच नकळत होऊन गेलात.आणि आज अचानक हा जिव्हाळ्याचा अपुर्व नजराणा देऊन आमच्या सर्वांचा गौरव केलाय..तो खरंच अविस्मरणीय असाच आहे.आमच्या हृदयात ❤️ कायमचं जतन केलेला राहील..!
    खूप छान लिहित रहा..अनेक उत्तमोत्तम साहित्य तुमच्या लेखणुतून साकार होऊन जनसमुदायाला वाचायला मिळा्वे हीच मनोकामना मनापासून करतो...!
    तुमच्या लेखन शैलीचे कौतुक कारावे तेवढे थोडेच.
    खूप छान अप्रतिमच👌
    धन्यवाद ..!
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  5. सर फारच कौतुक केलं हो. मी बायकोला वाचून दाखवलं तर ती म्हणाली डोंगर नेहमी दुरून चांगले दिसतात. जरा आठ दिवस राहून बघा मग समजेल. इथं मी आहे म्हणून टिकली.

    उत्तर द्याहटवा
  6. व्वा...व्वा..खूपच सुंदर शब्दात सर्व मंडळींचे... दिग्जांचे कौतूक कार्यावर छान लेख लिहिला आहे सर...खूप खूप सुंदर लिखाण🙏🙏😂

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...