मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

मळभ

 

My gallery 

मळभ मनावरचे 

काढुन फेका सारे

कधी तरी त्या सासुरवाशीनला 

कुठे फिरायला घेऊन जारे.!१॥


राब राब राबते 

दिवसभर घर सांभाळून 

खाण्यापिण्याचं पाहाते 

रात्री तुझे पाय दाबते.॥२॥


निच नालायका तु माझ्या लेका 

थोडीशीही तुला तिची दया येत नाही 

बायको केली का मोलकरीण 

लग्न झाले तेव्हापासून कुठेही तिला नेत नाही॥३॥


मळभ तिच्या मनावरचे 

काढुन फेक मूर्खा 

मी तिची सासु आहे तरी

तिच्यासाठी गोव्याचा टुर काढ बरका ॥४॥


तिच्या जिवाचे पाप 

मी माझ्या माथी कशाला लाविन 

तिला गोव्याला पाठवुन, मळभ काढुन 

काशीची यात्रा पुर्ण झाली हे गृहीत समजिन

॥५॥


असा बदल घडला पाहिजे

मळभ आपोआप निघते


मोहन सोमलकर 

🦚🌾🙏🥀🙏




५ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...