| My gallery |
एवढ्या मोठ्या घरात
होतो एकटाच मी निजलेला
साथ तिची जन्मभर्याची
पहाटेच्या उठणाऱ्या वेळी अलगत
तिचा आवाज माझ्या कानावर आला!
मी उठलो तसाच ,त्या आवाजाच्या
दिशेने पाहु लागलो,बेड रिकामा होता.!
तिचा तो स्वप्नातला "मोहन " म्हणुन आवाज
मला जागे करण्याचा होता..!
सत्व, अस्तित्व मनी
तिचे आहे थांबलेले
माझे विश्व तसेच आहे
सुगरणीच्या खोप्यासारखे
तिच्याभोवती विणलेले
ती कशीही असो
तापट असो
वा असो जिद्दी
प्रेमाची ती लाट
या वैराग्य रुपी सागराला
कधी कमी नाही केली
त्या लाटेची होतच राहली वॄध्दी.!
नसती ती आली जीवनात
कलह मनात किती झाला असता
हा माणुस मग
हिमालयावर जाऊन
बसला असता..!
🙏😊🍫मोहन सोमलकर 🙏👏🍬
वाह वा किती सुंदर शब्दांची गुंफण करता तुम्ही
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌
खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचनााकेली दादा ✍️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतीम रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाव्वा खूप खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली . 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाकरेक्ट लिहिलय माझी आई नसती तर तुमचं काही खर नव्हतं .😊😊👌👌👌👌🌹🌹
अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा