मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

माझी सावलीच ती

 

My gallery 


एवढ्या मोठ्या घरात
होतो एकटाच मी निजलेला
साथ तिची जन्मभर्याची
पहाटेच्या उठणाऱ्या वेळी अलगत
तिचा आवाज माझ्या कानावर आला!
मी उठलो तसाच ,त्या आवाजाच्या
दिशेने पाहु लागलो,बेड रिकामा होता.!
तिचा तो स्वप्नातला "मोहन " म्हणुन आवाज
मला जागे करण्याचा होता..!

सत्व, अस्तित्व मनी
तिचे आहे थांबलेले
माझे विश्व तसेच आहे
सुगरणीच्या खोप्यासारखे
तिच्याभोवती विणलेले
ती कशीही असो
तापट असो
वा असो जिद्दी
प्रेमाची ती लाट
या वैराग्य रुपी सागराला
कधी कमी नाही केली
त्या लाटेची होतच राहली वॄध्दी.!

नसती ती आली जीवनात
कलह मनात किती झाला असता
हा माणुस मग
हिमालयावर जाऊन
बसला असता..!

🙏😊🍫मोहन सोमलकर 🙏👏🍬


७ टिप्पण्या:

  1. वाह वा किती सुंदर शब्दांची गुंफण करता तुम्ही
    👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा खूप खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली . 👌👌👌👌👌
    करेक्ट लिहिलय माझी आई नसती तर तुमचं काही खर नव्हतं .😊😊👌👌👌👌🌹🌹

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...