| My gallery |

कैफ तिचा माझ्या
मनी असाच रेंगाळत होता
ति होती जिगरबाजाची लेक
तिच्या अंगी काटकपणा स्थिरावला होता
कैक संकंट आले गेले
हालली नाही ती,डगमगली नाही
दु:खावर मात करत राहिली
कैफ जगण्याची तिची थांबली नाही.!
दोन मोठे अपघात झाले
दोन आॅबारशनही झाले
जिगरबाजाची औलाद होती
नियतीने काय वाकडे केले.!
क्रिष्णाची भक्ती, मनमोहनाची शक्ती
निस्सीम करणे कोणावरही माया.!
अडल्या,नडल्यांना मदतीचा हात
झळकत आहे रविच्या तेजाने तुझी काया!
तु भारत देशाची भारती
भुवरी मनमोहनाची मुरली
गरजुंना मदत करता करता
तुझी तहान भुक हरली.!
कित्येकांना आधार देण्याची
तुझ्या मनी कैफ भरली
तु धैयवान नारी, सहचारिणी माझी
तुझ्या शिरी मी सुरक्षेची छत्री धरली.!
विहार कर स्वच्छंद तु
या निळ्याशार आकाशी
तुझ्या आशा,इच्छा पल्लवित कर
मन आपले मोकळे कर ,तु मंद वार्याची शीळ जशी..!
मोहन सोमलकर ©️®️
खूपच अप्रतिम रचना...👌✍️👍🍫🍫🍫🍫🍫🌹
उत्तर द्याहटवाछानच रचना 👌👌✍️✍️✍️
उत्तर द्याहटवावाहह..खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना ✍️👌👌
उत्तर द्याहटवासुंदर अप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाखूपच छान......👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏