दिसते ते स्वयंपाक घर वरवर
असते ते अन्नपूर्णा मातेचे वस्तीस्थान
समृध्दी नांदते जिथुन दिसते
अन्नधान्याला भरुन मिळे मान..!
तो खजिना गृहिणीचा तिथे
तिथेच सारी खाद्याने ,कडधान्ये
तिथेच सारा मुलद्रव्याचा खजिना
आत्मा ,मन वसते गृहिणीचा मानाने
सुगंध दरवळतो,मनाला बहरवितो
तिथे तृप्तीची ढेकर मिळते
जल शांत ,शितल तिथले करुनि ग्रहण
भुकेचे आक्रंदन कमी होते...!
स्वयंपाकघर असते आपुलकीचे
दोन शब्द व्यक्त करण्याचे स्थान
आरोग्यासंबंधी मिळे तिथे खनिज
स्वयंपाक घर हर गृहिणीचा अभिमान.!
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🌹🌹🌹😊🍉🍑🍊🍊🍊🍊🍊नागपुर
एका गृहिणी कडून खूप सारे आभार.🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूपच छान 👌
उत्तर द्याहटवावाचून भुक लागली..👍
आबा
🙏
धन्यवाद आबा😊😊😊😊✍
हटवाखूपच छान...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवा