मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३ एप्रिल, २०२२

सगळेच पुरुष निर्दयी नसतात..!

My gallery 

 


सगळेच पुरुष नसतात निर्दयी 

जाणीव स्त्रीत्वाची पुरुषांनाही असते

हे जग पाहण्यासाठी पुरुष 

स्त्रीच्याच उदरातुनी जन्म घेते


घरी राहुनी तो नात्यात गुतंला असतो

बाहेर पर स्त्रीला मान मातेसमान द्यावा

बहिण तिला वा मुलगी मानुनी 

तिचा आदर सदा करावा


राहिल सुरक्षित बाहेरही हर  नारी

ती तर आहे समाजाची उध्दारी

नका तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहा

चेष्ठा,निंदा,छेडकानी  करुनि 

पापाच्या नका जाऊ दारी..!


स्त्री समाजाचे प्रतिनिधित्व भुषविते

सर्वच क्षेत्रात मानाचे स्थान भुषविते

आता मुलीही तिरडीला खांदा देऊनि

कर्तव्य मुलाचे उजागर करते


कर्तव्य मुलाचे उजागर करते.....!


मोहन सोमलकर 


६ टिप्पण्या:

  1. खूपच छान सुंदर मनोगत व्यक्त केलय.
    तिचं जननी तिचं माता सदा सर्वदा
    तिचा आदर सर्वत्र झाला पाहिजे.
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा
    🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूपचं छान सर.... अनेक रूपात आपल्याला स्त्रीचं अस्तित्व दिसते..👍👌✍️✍️🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...