मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, २१ जून, २०२२

आंतरराष्ट्रीय योग दिवस

 



आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. त्या अनुषंगानेच मी हा विषय माझे जिवलग या आपुलकीच्या समुहात आज दिला आहे. 


आपल्या जीवनात योगासनाचे फार मोठे योगदान आहे, जर आपण आपल्या जीवनातील कमीत कमी एक तास तरी योगाभ्यासा करिता दिला तर. 


योग करुन मनाने व तनाने निरोगी राहता येते. मनातील नकारात्मक विचार योगामुळे आपण दुर करुन सकारात्मक दृष्टिकोन आपण आपल्या जीवनात आणु शकतो.


पहाटे नित्यनियमाने जर आपण योगसाधना केली तर आपण कधीच आयुष्यात आजारी पडु शकत नाही. हे योगगुरु  डाॅ. श्रीकांत वाडिले सरांनी आम्हाला योगसाधना शिकवतांना पटवून दिले.

योग करण्यापुर्वी काही मार्गदर्शक नियम 👇


1) पहाटे योगासन करण्यापुर्वी तुमचे पोट रिकामे असणे आवश्यक 

2) योगासन करण्यापुर्वी अर्ध्या तासाआधी शौचास जाऊन पोट रिकामे करणे आवश्यक 

3) योगाभ्यास करण्याच्या अर्धातास आधी काही खाऊ पिऊ नये.

4) योगाभ्यास खुल्या जागेत,खुल्या हवेत, जमे तोवर निसर्गाच्या सान्निध्यात शांत जागी कोलाहल विरहित स्थळी करावा.

5) योगाभ्यास करतांना सैल कपडे शक्य असल्यास सुती कपडे घालावे.

6) योगाभ्यास मोकळ्या मनाने व मनावर ताण न ठेवता तणावमुक्त राहुन करावे.

7) योगाभ्यास करतांना सगळे नकारात्मक विचार  किंवा कोणत्या कामाचे टेन्शन सोडुन द्यावे..!

8) योगाभ्यास केल्यावर लगेच काही खाऊ अथवा पिऊ नये.

9) कोणतेही नशापाणी करुन योग करु नये.

10) योगाभ्यास  योग्य मार्गदर्शनात करावा.


हे झाले नियम योगाभ्यास करतांनी


योगाभ्यासाचे जीवनात योगदान 

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀


योगाभ्यासाचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नित्यक्रमाने एखाद्या योगगुरुच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही रोज पहाटे एक तास योगाभ्यास केला तर तुमच्या शरीरावर व मनावर त्याचा फार छान परिणाम होतो. 


आरोग्य मनाचे व शरिराचे सुदृढ राहण्यास मदत होते. दिवसभर आपण खुप  तणावमुक्त जीवन जगत असतो. कुटुंबाचे प्रश्न,  कामाचा व्याप, मुलाबाळांचे प्रश्न,  पैसा, संपत्ती, भावावडिलांचे वाद इ. नकारात्मक गोष्टीचा मनावर व शरीरावर त्याचा परिणाम होतो.


परंतु योगाभ्यास नित्यक्रमाने जर केला तर आपण दिर्घ आयुष्यी किंवा चांगले जीवन जगु शकतो.


सकाळी उठल्यावर शौचाकडुन आल्यावर  फ्रेश झाल्यावर रोज योगाभ्यास करावा.

रोज शांत चित्ताने पहाटेच्या वेळी कोणतेही पाच मिनिटाची प्रार्थना म्हणुन आपल्या गुरुंना नमन करुन रोज नित्यनियमाने  ध्यान,यम,नियम,आसनाचे पालन करुन १२ सुर्य नमस्कार  रोज केले तर आपल्या आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.


पंधरा सूर्यनमस्कार, लोम विलोम, प्राणायाम,  विविध उपयोगी आसन करुन आपण अनेक रोगावर विजय मिळवु शकतो.


पाठीचे आजार, मानेचे आजार, गुढघा दुखी, पोटदुखी यावर विजय मिळु शकतो. 


तसेच आपण आपले संपुर्ण शरिर व मन योगाभ्यासामुळे सुदृढ ठेऊ शकतो.


योग विद्या धाम शिरपूर 

                  तर्फे

        *योग -प्राणायाम वर्ग*


👉योग वर्ग  -कालावधी-

दि. १ जून ते  २१ जून -२०२२


     👉एक बॕच 

वेळ सकाळी -६.१५ ते  ७.१५

(योगशिक्षक - श्री  शरद चौधरी सर )


      👉दुसरी बॕच

संध्याकाळी -६.१५ ते ७.१५

(योगशिक्षिका सौ.यशोदा धाकड )


(कोणत्याही एका  बॕचला प्रवेश घेऊ शकता )


*वर्गाची वैशिष्ट्ये*

आसन....

प्राणायाम.....

ध्यान.....

शिकवीले जाईल

तसेच....

😊  आनंदी ..🌲.सुखी...🌼..प्रसन्न .....🌹

जीवन  कसे जगता येईल.....

मन स्थिर  व शांत  कसे ठेवता येईल.......याचे ही सहज व सुंदर मार्गदर्शन .......


     याशिवाय .......👇


*आहार*----या विषयी  ..सखोल मार्गदर्शन म्हणजे ....नेमका आहार 

कोणता ? कसा ? केव्हा ?किती ? ...असावा....


तेव्हा ईच्छुक साधकांनी लगेचच प्रवेश घ्यावा.....कारण......प्रत्येक साधकाकडे  वैयक्तिक लक्ष देता यावे  व प्रत्येकाला  व्यवस्थित  शिकता यावे.... म्हणून ...*मर्यादित प्रवेश*

      

     *महत्वाच्या सूचना*

👉प्रवेश घेण्यासाठी  शुल्क रु.५००/- संस्थेच्या खालील बँक खात्यात भरावे

👉शुल्क भरल्यास लगेचच  screen shot खालील नंबर वर पाठवावा.....

9923288095

👉screen shot आल्यावरच प्रवेश निश्चित  समजला जाईल आणी त्या साधकांना गृपवर  घेतले जाईल.

👉बाहेरगावच्या साधकांना zoom link पाठवली जाईल.

शिरपूर शहरातील  साधकांनी  प्रत्यक्ष योगभवन येथेच यावे.

अधिक  माहीतीसाठी संपर्क व पत्ता ......

योगभवन 

योग विद्या धाम

पांडुरंग नगर

शहादा रोड

शिरपूर 

फोन--9923288095


👉खाते क्रमांक -

*13320100001670*

*Ifsc BARB0SHIRPU*

(Fifth charecter is zero)

खात्याचे नाव 

*योग विद्या धाम शिरपूर*

Bank Of Baroda


************************

या पत्त्यावर फोन करा व योगाभ्यास ऑनलाईन शिकायचा असेच तर सरांचे मार्गदर्शन घ्या . धन्यवाद 




धन्यवाद 

मोहन सोमलकर 🙏

नागपुर 







मोहन सोमलकर 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...