मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, २४ जून, २०२२

मोबाईल करा दुर,आरोग्य होईल सुदृढ

 








आज दिवस जरा वेगळाच उगवला होता. सुर्य नारायणाचे उठल्या बरोबर त्याला दर्शन झाले. हे त्याचे नित्याचेच असायचे तो झोपेतुन उठला की दोन्ही हाताच्या पंजाची जुळवनी करुन तो कुलदैवताला आळवुन ते हाता दोन वेळा चेहर्‍यावरून फिरवायचा व आपल्या दिवसाची सुरुवात करायचा.

त्यानंतर समोरच्या दिवाणखान्यात आला आणि सोफ्यावर बसुन प्रतिलिपीवरील नविन विषय पाहायचा. कोण किती श्रेणीत आले हे पाहिल्यावर तो कसेबसे आशेने व निराशेने एक दोन चारोळ्या लिहिल्यावर ,बाकीच्यांचे लिखाण आवर्जून वाचायचा.

मग त्यानंतर मोबाईल चार्जिंग वर लावुन बाकी सगळ्या प्रातर्विधी आटपुन रोपट्यांना पाणी द्यायचा. परत मग चहा घेतांना मोबाईल हातात. मग तो दहा पर्यंत मोबाईल नाही सोडायचा.

पण आज वेगळाच दिवस उगवला, गेल्या एक वर्षांपासून ही जी मोबाईलची सवय लागली त्यामुळेच त्याचे सगळेच रुटीन ( जीवनक्रम) बदलले.

शरीर त्याचे जड होत चालले, जागीच बसणे खुप वाढले मोबाईल मुळे.

पण आज जरा त्याचा दिवस वेगळाच उगवला, सुर्य नारायणाने त्याच्या डोक्यात प्रकाश टाकला.

आज तो साडे पाचच्या गजराबरोबर उठला, थोडा मोबाईल पाहिला. चार्जिंग वर लावला. प्रातर्विधी आटपुन.

त्याने आपला मॉर्निग वॉक चा ट्रकसुट घातला,पायात बुट घातले आणि निघाला तो नेहमीच्याच त्या हिरव्यागार बगीज्याकडे फिरायला. सकाळची ताजी व मोहक सुगंध मयी हवा घ्यायला. आज त्याला या नविन वातावरणी या नविन कार्यात खुप छान वाटत होते.

रस्त्यावर चालतांना बरीच लोक होती. पण शांतता,शुद्ध हवा, व मन शांत करत या वातावरणात रममान होऊन मस्त पुढे चालायचे होते .

थोड्या अंतरावर चालता चालता मग तो हिरवागार शांत निरमळ बगीजा लागला. ज्याचा सहवास तेथील माणसांचा सहवास एक वर्षापासून सुटला होता.

अचानक त्याला पाहून सगळेच आश्चर्यकारक नजरेने पाहु लागले, आणि अवाक नजरेने पहात त्याच्याशी हात मिळवु लागले.

ते वातावरण, ते मित्र बगीज्यातले त्याला खुप सुखावून गेले.

ते प्रत्येक जण करित असलेले योगाभ्यास, सराव व्यायामाचा हे पाहुन त्याचे मन खुप  प्रसन्नित झाले.

आणि तोही त्यात मिसळून एकरुप झाला.

आता त्याला गवसले होते कुठे फुल  आणि कुठे काटे आहे.

मोहन सोमलकर 🙏😊🌿


३ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...