जन्म मानवाचा॥ मानतो आभार॥- झाले उपकार ॥ तुझे देवा॥१॥
- आईच्या मी पोटी॥ घेतला तो श्वास ॥
- भेटला तो वास॥ जीवनात ॥२॥
- बालपण गेले॥ पाळण्यात खेळे॥
- आजीकडे वळे॥ नजर ती॥३॥
- लाडात वाढलो॥ आयुष्यी घडलो॥
- शिक्षण शिकलो॥ संस्काराचे॥४॥
- आईच शिकवी ॥ जीवन अध्याय ॥
- जीवन स्वाध्याय ॥ युवा असे ॥५॥
- पार पंचविशी ॥ होती मी केली॥
- तिच कामी आली॥ शिकवण ॥६॥
- बाबा ते धोरणी ॥ कडक शिश्तीचे ॥
- करे नियमाचे ॥ पालन ते ॥७॥
- जीवन अध्याय ॥ जीवन उपाय ॥
- असते ते काय ॥ शिकविले॥८॥
- मोहन सोमलकर नागपुर

अतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवा