जन्मदात्री आई॥ जगात आणले॥
पाऊल ठेविले॥ जन्मुनमी॥१॥
नाळ नात्यातील ॥ तुझी जुळलेली॥
तु कधी कळली ॥ पाडसाला॥२॥
वात्सल्य जिव्हाळा॥ तुझा कळकळा॥
सोसला उन्हाळा॥ आईतुच ॥३॥
डोळ्यात दिसावे॥ प्रेमाचे बघावे॥
मायाळु देखावे ॥ आईतुझ्या ॥४॥
कधी ना रागवे ॥ मनात जागवे॥
शिखर गाठावे॥ तुझ्यामुळे॥५॥
श्वासांचा सहारा॥ रात्रीचा पहारा॥
प्रितीचा फवारा ॥ तुझा होता॥६॥
रागावले तुला॥ शांतच राहिली॥
मौनपणे दिली॥ कबुली तु॥७॥
मोहन सोमलकर नागपुर

छानच आहे अभंग 👌
उत्तर द्याहटवाआबा
🙏
Thanks aba
उत्तर द्याहटवा