मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

॥दत्ता अवधुता॥

 ॥॥अवधुता दत्ता॥॥

My gallery 


जय देवा दत्ता॥ स्वामी अवधुता॥

ऐक ना तु हाक॥ घरे बेचिराख ॥


वणवा पेटला॥ नाही तु भेटला॥

 निखारा दाटला॥ मनी आगीचा॥


कोण शमविल ॥शांत ती करील ॥

आग विझविल॥ वेदनेची॥


दर्शन तु दिले॥ शांत मज केले॥

राख होऊ नाही दिले॥ स्वप्न माझे॥


⛳🙏मोहन सोमलकर! 🙏⛳

वाढदिवस पुन्हा येवो

 

My gallery 
आज त्याचा आहे दिवस आनंदाचा,

भाऊ माझ्या पाठचा मनाचा मोठा

सुख,आनंद यशाची कधी कमी नसावी

ह्दयी त्याच्या कोणाप्रती जिव्हाळ्या नाही तोटा.!


मेहनत करतो तो अपार 

कष्टाचा डोंगर करतो तो पार 

काट्यातुनि अनवाणी चालतो 

डोक्यावर पेलतो कुटुंबाचा भार..!


दिया आणि अंतरा या दोन लेकी

त्याच्या पोटी आहे जन्मल्या..!

चेहर्‍यावर त्यांच्या विद्या व समृद्धी नांदते 

मला वाटे जणु लक्ष्मी व सरस्वतीच  आल्या.


सुखाच्या त्याच्या जीवनात असाच 

वाहिल सदैव अमृताचा झरा 

सदैव आयुष्य सुखाचे जावो त्याचे 

शांततेचा जीवनात मिळो त्याला आसरा!


माझ्या किशोर या लहान भावास 

वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा🍫🍫🍫🌾

💐💐💐💐🍦🥟🍬🍧🥧🍫🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖🏖

मोहन सोमलकर व परिवार

शुभेछुक 



ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...