सगळेच पुरुष नसतात निर्दयी
जाणीव स्त्रीत्वाची पुरुषांनाही असते
हे जग पाहण्यासाठी पुरुष
स्त्रीच्याच उदरातुनी जन्म घेते
घरी राहुनी तो नात्यात गुतंला असतो
बाहेर पर स्त्रीला मान मातेसमान द्यावा
बहिण तिला वा मुलगी मानुनी
तिचा आदर सदा करावा
राहिल सुरक्षित बाहेरही हर नारी
ती तर आहे समाजाची उध्दारी
नका तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहा
चेष्ठा,निंदा,छेडकानी करुनि
पापाच्या नका जाऊ दारी..!
स्त्री समाजाचे प्रतिनिधित्व भुषविते
सर्वच क्षेत्रात मानाचे स्थान भुषविते
आता मुलीही तिरडीला खांदा देऊनि
कर्तव्य मुलाचे उजागर करते
कर्तव्य मुलाचे उजागर करते.....!
मोहन सोमलकर

