मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, ११ जून, २०२२

वाढदिवस ज्ञानाताई वानखेडेचा

 


वाढदिवस ११ जुन ज्ञानदेवी
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

हर्ष मनी मायबापाच्या त्या दिवशी
किती दाटला असेल..!!
आई रेखाच्या पोटी
तान्हुली ज्ञानाने जन्म घेतला असेल !!

आई रेखा व पिता सितारामजी
यांची हि कन्या कौतुक तिचे सांगण्यापरी काय करावे.!!

लेक कोणतेही असो ती
येते घरात लक्ष्मीची व सरस्वतीची पाऊले घेऊन
यश,किर्ती, अन गुणगौरवाचे
ती घेते जीवनात आपल्या धागे जुडवुन!!

होता तो मृग नक्षत्राचा माहे जुन
ओढ पावसाची होती सर्वास, तापत होते उन
इतक्यात एक सर आनंदाची वानखेडे वाड्यात आली
स्वर आनंदाचा, कोकिळेचा ऐकु आला जणु घर झाले आनंदवन

तीव्र तेज तिच्या माथ्यावरती होते
कन्येचे पाय पाळण्यातच दिसले होते
पाहिल्या जेव्हा स्पर्शून तिच्या कपाळावरील रेषा
आजी- आजोबा तिचे खुप आनंदी झाले होते..!.!

तेव्हाच तिथेच पाळण्यात खेळतांना
आजोबांनी तिच्याबद्दल भविष्यवाणी केली
नावलौकिक मुलगी घराण्याचे उज्वल करणार
लेखणी हाती घेऊन शिक्षणाची गती समाजाची वाढविणार!

पताका ज्ञानाची ,ज्ञानरजनी, ज्ञानदेवी ज्ञानरेखा ती
आकाशात सदा प्रगतीने फडकवित ठेवणार
वैभव तिला लाभले शिक्षणाचे
संस्कार, भाषेची लकब, मोठ्यांचा आदर, नम्रता हे गुण तिच्या
धमण्यातुनि वाहणार.!

हि एक फक्त झलक होती
तिच्या अंगी सगुणाची तर भरमार होती
उत्तम शिक्षिका,योग्य वाक् चातुर्य, मराठी भाषेवर प्रभुत्व व लेखनशैली उत्तम
अशी ज्ञानाताई ज्ञानगंगा होती..!

पुढे खुप मोठे आयुष्य तिचे वैभवशाली आहे
ही ज्ञानाताई ज्ञानसरिता ,ज्ञानगंगा होणार आहे
अहंम भाव नसे यतकिंचितही तिच्यात
ही ज्ञानरेखा पुढे पुढेच धावणार आहे..!

खुप आशिर्वाद द्या तिच्या पाठी
आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, प्रगती बनले तिच्या साठी
आपुलकी,जिव्हाळा व स्नेहाच्या ना तुटव्या ह्या गाठी
निवडक मोती शी नाते जुडुन राहावे रोज खाऊ साखरतुपाची वाटी.

आज या अशा मंगलमय वाढदिवसाच्या दिवशी
"A new girl in chandrapur " च्या
राहिलेल्या इच्छा,आकांक्षा,स्वप्न पुर्ण होवोत
व नुसताच आजचाच दिवस नाहितर
संपुर्ण पुढिल आयुष्य तिचे ,ज्ञानाताईचे मंगलमय होवो.!

वाढदिवस खुप खुप हार्दिक शुभेच्छा
निवडक मोती कडुन

व मोहनदादा व भारतीवहिनी कडुन अनेक आशिर्वाद
‼️ज्ञानदेवी ताईला..!‼️

💐मोहन सोमलकर 💐




शुक्रवार, १० जून, २०२२

आतुरता पावसाची

 


तापला जरी उन्हाळा

दिवसभर उन्हात घाम गाळत होती

रखरखत्या उन्हातही ती मेहनतीने अंग झिझवत 

पाठिला तान्हुन्याला बांधुन विटा उचलत होती !


दिवसभर आमच्याही अंगाहुन उन निघुन जाये 

जबरदस्ती नाही प्रेम हर ऋतुवर प्रेम आनंदाने केले

उन्हात अंग तापवुन खुप 

खिशात दोन पैसे आम्ही कष्टाने जमा केले.!


दिवसभर दमुन आलो की घरी

अंगणातल्या त्या चिंचेच्या,वडाच्या, कडुलिंबाची छाया

सुखाऊन गार गार ती हवा 

वाटे जणु आहेच आमच्या आईची माया.!


खुप होती प्रत्येकाच्या अंगणी मोठमोठी झाडे

बसायचे ओसरीवर सायंकाळी सारे लहान मोठे

असायच्या बाया भाभड्या अन पोरे सोरे 

गोष्टी माथा चालायच्या  गार वार्यासाठी होती वृक्ष डौलदार मोठे.


गेला तो काळ आता

तोडल्या गेली ती वयस्क झाडे 

सिमेंट काँक्रिट ची जंगले जिथे तिथे दिसे 

श्वास गुदमरल्या जाई आता वाटे वेडेपिसे 


तो काळ दुसरा होता

हा काळ दुसरा आहे


मोहन सोमलकर

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...