मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

चहा आणि चहा बनविणार्यावरचे प्रेम

 


चहा आणि प्रेम

 
या विषयावर अशा  अनेक  कथा आपण लिहु शकतो. मला आठवते मी नुकताच बारावीची परिक्षा १९९२ला पास केल्यानंतर कोणत्या काॅलेज मध्ये अ‍ॅडमिशन  घ्यायची आणि कोणते क्षेत्र निवडायचे हा विचार  करीत असतांनाच .माझा एक जवळचा मित्र  आपण कला क्षेत्रात अ‍ॅडमिशन  घेऊन छान पैकी  कथा,  कादंबरी, निबंध लघु लेखन कविता इ. साहित्याचा आस्वाद घेऊ म्हणुन  सांगु लागला.
            झाले मग एकदाचे ठरले कला क्षेत्रात  जायचे. अ‍ॅडमिशन झाली आणि  काॅलेज  सुरु झाले. त्यावेळेस प्रत्येकाकडे दोनचाकी गाडी फार निवडक लोकांकडे असायची. आणि  असली तरी नुसते काॅलेज मध्ये जायला कुणी जास्त  वापरत नसे. मग बाबांनी घेऊन दिलेल्या सायकलनी मस्त पैकी मी आणि  माझा मित्र ५किलोमिटर अंतरावर असलेल्या काॅलेज घेऊन जायचो..
  
        काॅलेज मध्ये जाणे आता नित्याचे चालु झाले.  ५ कि.मी अंतर सायकल ने गाठल्यावर आम्ही  काॅलेजच्या आधी थोड्या अंतराआधी एक छोटेसे चहाचे दुकान होते. तिथे चहा घेत बसायचो. चहा बनवणे वाल्या दुकानदाराचे नाव मधु होते. मधु शरीरयष्टी ने अगदी  बारीक ४० ते ४२ वर्षे वयाचा असावा. शांत स्वभावाचा  आपला चहा बनविण्यात गुंग असायचा. बसायला बाहार खुर्च्या दुकानावर शेड नाही. आपला एका डेबलावर स्टोव्ह ठेऊन त्यात राॅकेल भरुन  हाताने पंप मारायचा. त्यावेळेस पाच पाच किंवा आठ ते दहा जणांची पुणॅ मित्रांची  टोळी मधुचा चहा पिण्यासाठी तिथे बसायची.

       मधु नावाप्रमाणेच प्रेमळ त्याच्या बोलण्यात साखेरेचा गोडवा घेऊन बोलायचा.
"मधुचा चहा" म्हणजे  छान पुणॅ गंजात नुसत्या दुधात साखर अगदी मोजून,  चहापत्ती, विलायची छोट्याश्या खलबत्त्यात कुटुन आणि अद्रक पण छान ठेचून ठेचून बारीक  केलेले आणि  मग तो चहा उकळुन त्याला मधुर असा पिण्यालायक बनवायचा.
तो चहा पिल्यानंतर,'असे वाटायचे जणु.....मधुने ......आपले प्रेम ओतले की काय असे वाटायचे.  मित्रांची मैफिल सजलेली असायची. येणारा अजुन एखादा येऊन बसायचा.सकाळी सुरु झालेला मधुचा चहा संध्याकाळी अगदी ५ वाजेपर्यंत चालुच राहायचा. मधुचा चहा...घ्यायला  ,"आजुबाजुला असलेले ऑफिस  मधले लोक फार शौकीन झाले होते.... कारण मधु त्या चहात आपला जीव आणि प्रेम ओतत होता.......
            कधी बोलता बोलता आम्ही  दुसरे गिर्‍हाईक नसले आणि  आम्हाला  सवड असली की, मधु ला बोलते करायचो. त्याच्याबद्दल त्याच्या परिवारातील लोकांबद्दल जातीने विचारपूस  करायचो. मग मधुही..... आम्हाला  थोडा मिस्किलपणे चेहर्‍यावर हास्य  आणित आपल्या मुलाबाळांबद्दल सांगायचा.... त्याच्या मधुर वाणीने आणि मधुर चहाने.....  सवॅ  विद्यार्थ्यांना  निस्सीम  अस प्रेम मिळाल होत...
त्यावेळेस  च्या त्या १रु च्या  "चहा" मध्ये  आणि मधुच्या बोलण्यामध्ये जी गोडी होती... ती गोडी मला व ते मधुचे प्रेम काॅलेज  पुणॅ होऊन ...........आज २० वषॅ लोटली...... पण कुठे भेटली नाही.......

ते मधुचे निस्सीम प्रेम  व तो मधुचा चहा...... आम्ही  मित्र  कधिच  विसरु शकणार नाही. ....🙏🙏🙏🙏

..................................

कथा कशी वाटली. ... अभिप्राय  सांगावा

मोहन सोमलकर ☕☕☕🍵🍵
☕☕☕☕☕🌺🌺🌺🌺🌺


१३ टिप्पण्या:

  1. आयुष्यातील अशा सुंदर आठवणी कधीच विसरू शकत नाही.... खूप सुंदर लिहिलं आहे.... अप्रत्यक्षपणे चहाच्या टपरीवर जाऊन आलो 👌👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान....ना विसरता येण्यासारख्या आठवणी मनात कायम घर करतात ...👌👍✍️🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  3. व्वाऽ...!!
    खूपच छान अनुभव कथन केला..👌
    अप्रतिम...!!
    ३० वर्षांनंतरही मधूच्या नावाचा उल्लेख करावा असं तुम्हाला वाटलं...हे त्या मधूचे कौशल्य..!
    त्याने केलेल्या कामाची पावती त्यास तिस वर्षांनंतरही मिळते.. हे काही घेण्या सारखे काम आहे.माणसाने नेहमीच असे काम करावे की त्यांची आठवण कायम दुसर्याच्या मनात रूजली पाहिजे...!!
    खूपच छान अप्रतिमच.!👌
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...