सांजवेळी सख्याची आठवण....!
नवविवाहित म्हणुन तु मला लग्नाच्या बेडीत बांधून आणले, पहताच क्षणी माझ्या आईने माझ्या काकू, मोठ्या वहिनी, लहान वहिनी, लहान काकूशी कानाशी कुजबूज करित हितगूज करणे सुरु केले होते.
आणि तेव्हाच माझ्या आईने तुझ्या बद्दलचा शेरा देऊन दिला होता, काय देखणा आणि रुबाबदार आहे पोर्या.
अंगकाठी भारदार आणि ऊंच पाहुन माझं सोड सख्या माझ्या आईलाच तू पसंत आला होता.
पोह्याच्या प्लेटा मी ट्रे मध्ये घेऊन आली, आणि तुझ्याजवळ येताच, तुला डोळ्यात डोळे टाकुन दोन सेकंद पाहत राहिली.
तिथेच आपले दोघांचे मन जुडले.
तु होकार देशील म्हणुन पक्के ठाव होते. तसं तुझा चेहराच सांगत होता. जशी मी नजर भिडवली तुझ्या नजरेला,तशी तु लाजेने मान खाली केली. तिथेच मी हेरले, हा गडी आपल्यासाठी फिट बसेल पक्का.
काय माझं नशीब सुंदर रे, तु सांगत होता, याआधी एकही तू मुलगी पाहिली नाही. मी म्हणजे पहिलीच होय.
देवानं आपली जोडी,ती खुणगाठ वरच घट्ट जोडली होती, सातफेरे झाले डोईवर अक्षदा पडल्या, मी तुझ्या मिठीत, आणि तू माझ्या मुठित आला. दोघांचे अंतरंग उलघडल्या गेले.
मी तुझा स्पशॅ जाणवला,आणि तु माझ्यात एकरुप झाला.
पण लग्नानंतर सुरुवातीचे दिवस एकरुप होण्याचे, पण काही दिवस भेटले आपल्याला प्रणयक्रिडा करायला, तू पटकनच निघून गेला सिमेवर तुझी ऑर्डर आली तशी, दिवस कसाबसा कामात जातो.
सख्या सांजवेळी माझे डोळे भरुन येते, सांजवेळी तू परतून यावे आणि मला मिठित घ्यावे,माझे काळीज फडफडते, फडफडते.
"विरह मनात तुझ्याप्रती दाटून आला
वाट पाहाते,लोचूनी अश्रूंचा थेंब साठवून आला.!"
मोहन सोमलकर
एक असा पण विरह. खूप खूप छान
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर जी🙏🙏🙏🙏🙏🌿🍁
उत्तर द्याहटवाKhupach chan lekh
उत्तर द्याहटवा