वेळ आहे का बोलायला
कधी नसतो वेळ बोलायला
जेवढा तंत्रज्ञानाचा विकास
आयुष्य गुरफटत जाते भोवती
जीवन सवाॅचे झाले भकास
पूर्वीचे जीवन खळखळता झरा होता
सुखदुःखात मनुष्य उभा होता
एकमेकांप्रती सलोखा होता
प्रत्येक जण ह्दयी गोतावळा सांभाळत होता.!
आता माणुसच माणसाचा वैरी झाला.!
एकमेकातला संवाद संपला
जिथे तिथे माणुस मोबाईल मध्ये हरवला.!
नात्यात दुरावा वाढतच गेला.!
सगळेच शाॅटकटच्या मागे धावु लागले
खरे आयुष्य जगणे विसरू लागले
बोलणे एकमेकांशी टाळु लागले
मोबाईल मध्ये तोंड खुपसुन राहु लागले.!
लग्नात,समारंभात पंक्ती उठायच्या.!
थट्टा मस्करी करित पंक्ती वाढायच्या.!
श्लोक जेवणाच्या सुरुवातीला
मस्तपैकी मुखाने मैफिली वदवायच्या.!
चेहरे फुलावाणी बहरायच्या.!
गेली ती गमंत जमंत
गेली सारी थट्टा मस्करी
पारावरची मैफिल गतकाळात विलिन झाली
ती पिढीच आता लुप्त झाली..!
संवादाचे झाले modernisation!
भाऊच भावाशी बोलत नाही
Friend request पाठवुन तो next generation चे पाळतो सारे नियम.!
पिता वयोवृद्ध ते झाले
मुलासोबत संवाद साधायला आतुरलेले
ताटावर बसल्यावर एका हाती टि.व्हीचा रिमोट
दुसर्या हाती मोबाईल धरले
बाप बिचारा केविलवाणा झाला
बोल मनातला हरपुन गेला
जन्म दिला ज्या मुलाला
तो विज्ञानयुगी व्यस्त झाला..!
मोहन सोमलकर 🙏🏼🙏🏼🙏🏼💐
![]() |
| माणुस माणसाला विसरत चालला..! |

अप्रतिम वास्तवदर्शी रचना सर खुप सुंदर
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद अनिल दादा🙏👍
हटवामोहनजी ऽ ...!!
उत्तर द्याहटवाखूपच छान विषय मांडला आहे..!!
अप्रतिम काव्य झाले आहे; पण कुटुंबातील त्रुटी मांडलं आहे.. ! वास्तवातील परिस्थिती घराघरात जाऊन पोहोचलय...! विज्ञान-तंत्रज्ञान एवढं वाढलंय की त्या योगे मनुष्य वेगळ्याच विश्वात रमू लागला आहे....!!
खूप खूप विषय मांडला ...!🌹
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आबा 🙏
अप्रतिम समिक्षेबद्दल खुप खुप धन्यवाद आबा 😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏
हटवामोहनसर... अप्रतिम शब्दगुंफण !🌹👏 अत्यंत जिव्हाळ्याचा विषयावर लेखन केले आपण!👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर 👌👌👌🙏😊
हटवाअतिशय सुंदर लिहलय.. खरच संवाद संपला आहे 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद खुप खुप
हटवासुंदर लेखन केले दादा ✍️👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना ������
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेश दादा
हटवाखूप छान विषय हाताळला अप्रतिम रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवामोहन दादा ..खूप खूप ..सुंदर लिहिलंय वास्तविक रचना केली...मस्तच
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर, वास्तव रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सर खुप सुंदर
उत्तर द्याहटवा