मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

बोल माणसातलं हरवले आहे

 वेळ आहे का बोलायला


कधी नसतो वेळ बोलायला 

जेवढा तंत्रज्ञानाचा विकास

आयुष्य गुरफटत जाते भोवती

जीवन सवाॅचे झाले भकास 


पूर्वीचे जीवन खळखळता झरा होता 

सुखदुःखात मनुष्य उभा होता

एकमेकांप्रती सलोखा होता 

प्रत्येक जण ह्दयी गोतावळा सांभाळत होता.!


आता माणुसच माणसाचा वैरी झाला.!

एकमेकातला संवाद संपला

जिथे तिथे माणुस मोबाईल मध्ये हरवला.!

नात्यात दुरावा वाढतच गेला.!


सगळेच शाॅटकटच्या मागे धावु लागले

खरे आयुष्य जगणे विसरू लागले

बोलणे एकमेकांशी टाळु लागले 

मोबाईल मध्ये तोंड खुपसुन राहु लागले.!


लग्नात,समारंभात पंक्ती उठायच्या.!

थट्टा मस्करी करित पंक्ती वाढायच्या.!

श्लोक जेवणाच्या सुरुवातीला 

मस्तपैकी मुखाने मैफिली वदवायच्या.!

चेहरे फुलावाणी बहरायच्या.!



गेली ती गमंत जमंत 

गेली सारी थट्टा मस्करी 

पारावरची मैफिल गतकाळात विलिन झाली 

ती पिढीच आता लुप्त झाली..!


 संवादाचे झाले modernisation! 

 भाऊच भावाशी बोलत नाही 

Friend request पाठवुन तो next generation चे पाळतो सारे नियम.!


पिता वयोवृद्ध ते झाले

मुलासोबत संवाद साधायला आतुरलेले 

ताटावर बसल्यावर एका हाती टि.व्हीचा रिमोट 

दुसर्‍या हाती मोबाईल धरले


बाप बिचारा केविलवाणा झाला 

बोल मनातला हरपुन गेला

जन्म दिला ज्या मुलाला 

तो विज्ञानयुगी व्यस्त झाला..!




मोहन सोमलकर 🙏🏼🙏🏼🙏🏼💐



माणुस माणसाला विसरत चालला..!


१५ टिप्पण्या:

  1. मोहनजी ऽ ...!!
    खूपच छान विषय मांडला आहे..!!
    अप्रतिम काव्य झाले आहे; पण कुटुंबातील त्रुटी मांडलं आहे.. ! वास्तवातील परिस्थिती घराघरात जाऊन पोहोचलय...! विज्ञान-तंत्रज्ञान एवढं वाढलंय की त्या योगे मनुष्य वेगळ्याच विश्वात रमू लागला आहे....!!
    खूप खूप विषय मांडला ...!🌹
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. मोहनसर... अप्रतिम शब्दगुंफण !🌹👏 अत्यंत जिव्हाळ्याचा विषयावर लेखन केले आपण!👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर लिहलय.. खरच संवाद संपला आहे 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान विषय हाताळला अप्रतिम रचना केली 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. मोहन दादा ..खूप खूप ..सुंदर लिहिलंय वास्तविक रचना केली...मस्तच

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...