🌿🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🍁🌿
रेशीमगाठ ब्रम्हदेवाने तुझीनिमाझी जोडली
त्याची महती कधी तुला न होती कळली !
वेडे 🌹तु नसेल प्रेम करत मनोभावे मज
पण मी मात्र तुझ्या ह्दयी आपली प्रित रिती केली!
💮💮💮♦️💮💮♦️💮💮💮💮♦️
तुला काय कळणार त्या मंगळसुत्राच्या मण्यांची संकल्पना
ते बंधन तु तर मोडुन दुर केले होते
गळ्याला त्रास होतो म्हणून काढले होते
हे करतांनी तुझ्या मनाला तरी पटले होते
काय ठेवले तु आपल्या शरिरावर
माझ्या नात्याचे प्रतिक म्हणुन
कसेतरी बोटाला घट्ट पकडुन जोडवे पायात होते.
तेही तु पायाची नस लागते म्हणुन काढुन टाकले
तरी तुला मी राणी माझ्या मनमंदिरी पुजले होते..!
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
विलग,अलग तुला मी कधीही आपल्यापासून
तुला प्रिये होऊ देणार नाही मी
तु माझे पहिलेच आणि शेवटले प्रेम आहेस
माझ्या मरणाआधी तुला मृत्युशय्येवर चढु देणार नाही.!
तु माझे शरीर मी तुझा आत्मा आहे.!
मी तुझी गाडी, तु माझे इंधन आहे.!
तु माझी गॅस मी तुझा सिलेंडर आहे.!
तु असशिल ताव्यावरली भाकर मी ठेचा आहे
🌺🥀🌺🥀🌺🥀🌺🥀🌺🌺🥀
तु कितीही दे वेदना,कितीही झगड
मी स्वतःला समजेल फुल तुला दगड
तुला समजेल देव, मला भक्त समजिल
तुझ्या बाहुत डोके ठेवून आलिंगन देईल
🪴🥀💖🌹💗🪴🥀💞🌹🪴🥀💞
मोहन सोमलकर

व्वा..सर अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम भावना व्यक्त केल्या..🌷
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना केली सर आपण!!🌷🌷
आबा 🙏
खुप सुंदर , वास्तवदर्शी , अप्रतीम रचना....छान लिहीलय...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली.
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिलंय 👌👌👌
खूपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा