दुर अंतरावरी तिचे गाव॥ कसे तिथे जाव॥
पाझर फुटतो ह्दयी पडे घाव ॥ विरहाचे॥
ही भाऊबीज तोंडावर ॥ नाही मनावर आवर
प्रेम तिचे खरं ॥ सदा दाखवे बाजरीभाकर ॥
भाग्यवान समजतो॥ जरी बहिण दुरवर॥
कल्पनेची शब्दशक्ती ॥ देवावर भक्ती॥
ती वात्सल्य मुर्ती ॥ हळवे तिचे मन॥
शहारून जाते मन ॥ शब्दाचा पाऊस पाडी॥
बहिण ती कोमलमन ॥ सदा तिला स्मरण ॥
नित्य मायेचे धन ॥ बरसावे॥
आशिर्वाद तयांना ॥ सदा माझ्या बहिणींना ॥
तिन्ही शब्द सखींना॥ जीवनभर रहावा॥
मोहन सोमलकर 🌺🙏🌺🍫🌺🍫🍫🌺🍫🍢

छानच 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर व खुपच भावना स्पर्शी कविता लिहिली दादा आणि आम्हा तिघी बहिणींची सुद्धा तुम्ही खूप सुंदर नावासहित वर्णना केली अप्रतिमच लिहिलं दादा 👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🍫🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा