मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

घरच्या महालक्ष्मीचे पुजन करा

My gallery 

मांगल्य तिच्यामुळेच घराचे

ती अस्तित्व आहे जीवनाचे

दारोदारी ,घराचा कोपरा सजतो

तिच्या श्वासाने 

कुटूंबाची वेल बहरते तिच्याच असण्याने


मातीची महालक्ष्मीची मूर्ती विकत आणुन तिच्यात आपण देवत्व शोधतो.!

सदैव आयुष्यभर साथ देणाऱ्या 

महालक्ष्मीला का बरे हो विसरतो.!


साक्षात जी तुमच्या जीवनात 

सदैव आपले सर्वस्व अर्पण करुन 

तुमच्यासाठी जी श्वास घेते.!

तिला विसरुन मग 

आपण आपले अस्तित्व देवात कसे शोधतो..


घरच्या लक्ष्मीचे मन जाणा

तिच्या भावना जपा.!

तिचे स्वप्न काय, 

तिची इच्छा 

काय 

हे 

जाणा ,तिला पाहिजे असलेले सुख आणा! 

तेव्हाच तुमचे 

लक्ष्मीपूजन 

सार्थक 

होईल


मोहन सोमलकर 

🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹

६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्द रचना...अगदी खरं आहे......👌👍✍️✍️🍫🍫🍫🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर विचार मांडले तुमच्या रचनेतून 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूप खूप सुंदर रचना 👌👌👌👍 स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी कविता 👌👌भावली 👍👍

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...