My gallery
मांगल्य तिच्यामुळेच घराचे
ती अस्तित्व आहे जीवनाचे
दारोदारी ,घराचा कोपरा सजतो
तिच्या श्वासाने
कुटूंबाची वेल बहरते तिच्याच असण्याने
मातीची महालक्ष्मीची मूर्ती विकत आणुन तिच्यात आपण देवत्व शोधतो.!
सदैव आयुष्यभर साथ देणाऱ्या
महालक्ष्मीला का बरे हो विसरतो.!
साक्षात जी तुमच्या जीवनात
सदैव आपले सर्वस्व अर्पण करुन
तुमच्यासाठी जी श्वास घेते.!
तिला विसरुन मग
आपण आपले अस्तित्व देवात कसे शोधतो..
घरच्या लक्ष्मीचे मन जाणा
तिच्या भावना जपा.!
तिचे स्वप्न काय,
तिची इच्छा
काय
हे
जाणा ,तिला पाहिजे असलेले सुख आणा!
तेव्हाच तुमचे
लक्ष्मीपूजन
सार्थक
होईल
मोहन सोमलकर
🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹
अप्रतिम शब्द रचना...अगदी खरं आहे......👌👍✍️✍️🍫🍫🍫🍫🌹
उत्तर द्याहटवामानसीजी खुप खुप धन्यवाद आपले
उत्तर द्याहटवावाहह... खुप सुंदर विचार मांडले आहेत...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर विचार मांडले तुमच्या रचनेतून 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर रचना 👌👌👌👍 स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी कविता 👌👌भावली 👍👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा