My gallery
हातावरच्या रेषा
आयुष्य तिचे कपडे-भांडी काढण्यातच गेले..!
हातवरल्या नशिबाच्या रेषा संपुर्ण मिटल्या
उष्टी काढण्यात काय वाईट वाटणार
पोटाची खळगी भरण्यात या गोष्टी पटल्या.!
जीवन चिंधी चिंधी झाले
लक्तरे जीवनाची दिसु लागली चव्हाट्यावर
नवरा सारी मिळकत दारूत उडवु लागला
व्यसनाच्या आधीन चालु लागला काळोखी वाटेवर..!
लखलखीत प्रकाशात लोकांची दिवाळी
होत होती सुखात,आनंदात साजरी..!
तिच्या हाताला नुस्तेच काम, नव्हता आराम
पेटणार्या दिव्यात सुखाची किरण दिसत होती तरी.!
धुणे-भांडी करण्यातच पुरती ओली झाली
आनंदुन गेली बिचारी एक घरी पुरणपोळी खायला मिळाली
मालकीण म्हणाली आज मोलकरीन नाही तु
दोन घास घे तु पोटात टाकुन घे,नवी कोरी साडी आणली
तुझ्यासाठी आपले अंग झाकुन घे..!
मळघट आपल्या जीवनातले,मळघट आपल्या विचारतले तु
काढुन टाक सखे, कधी लागले तुला शे,पाचशे
मला मागुन तु घे, फाटलेले वस्त्र परीधान नको करु.!
नशीब फाटले असेल , पण वस्त्र फाटलेले नेसू नकोस..!
मिही एक स्त्रीच आहे ,स्त्रीचे दु:ख मला कळते,माझ्या बोलण्यावर हसु नकोस..!
भुक लागली तर आपले समजुन सांगायचे
मालकीण म्हणुन नाही तर ,सखी समजुन वागायचे
तुला स्नेह दिल्याने माझी संपत्ती कमी होणार नाही
मोलकरीण म्हणुन तु कधीच असे हिरमुसल्या चेहर्याने नाही जगायचे.!
एका लक्ष्मीने जर दुसर्या लक्ष्मीचे दु:ख ओळखले तर
प्रत्येक दिवशी लक्ष्मीपूजन साजरे होईल
पुसल्या गेल्या जरी हातावरल्या रेषा
हे दृश्य पाहुन लक्ष्मीमाता जरूर तुमच्या घरी येईल.!
जरूर तुमच्या घरी येईल.!
दिवाळीचे दिवस साजरे करा.!
मोहन सोमलकर 🪔💥🙏😊🌺

खूप खूप छान रचना मोहनजी
उत्तर द्याहटवा👌👌👌🙏🙏
धन्यवाद रंजुजी
हटवाखुपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद अश्विनी ताई
हटवालय भारी 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा