My gallery
मैत्री मदतीची नसुन मनाला जपणारी
संकंट काळी जो येतो धावुन
तो प्रिय सखा वाटतो
जो प्रिय असतो जीवाचा
त्याने दगा दिला की कंठ दाटतो.
राम वनवासी दरदर भटकला
भाऊ पाटीराखा लक्ष्मण
सदैव सावलीसारखा पाठीशी राहिला
गेले आनंदुन रामाचे मन.!
हनुमानजी काय तयाची लिला
भोळी भक्ती रामप्रती तयाची
मनात कोरली प्रतिमा हनुमानाने
प्रिय सखा प्रभु श्रीरामाची..!
एवढे मित्रप्रेम कधी नसेल पाहिले
अंतःकरणात रामसिता होते बसले
हात दोन्ही छातीला त्यांनी लावले
फाडुनी मनातुन भगवंतच ह्दयात दावले.!
धन्य धन्य भक्ती व मित्रप्रेम
ते जगाला हो दिसले
रामजीचे नाव माझ्या आधी घ्या
असे वीर हनुमान जगाला बोलले..!
सियावर रामचंद्र की जय
पवनपुत्र हनुमानजी की जय🙏🌹🙏🌹
मोहन सोमलकर 🙏🌹
जय श्रीराम 🙏
उत्तर द्याहटवा🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👍
श्रीराम जय राम जयजयराम
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना केली दादा👌👌👌
उत्तर द्याहटवा