Gallery
तसे पाहिले तर श्री. उदयराव परुळकर यांचा व माझा काहीच संबंध नाही. आणि तसे पाहिले तर आहेही. त्याचे असे की, प्रतिलिपी, काव्यपुष्प या साहित्यिक समुहातील प्रतिभावंत कवियत्री व लेखिका सौ. रंजुजी उर्फ उर्मिलाजी परुळकर यांचे उदयराव परुळकर हे यजमान आहे.

सौ. उर्मिलाताई परुळकर ह्या बहुआयामी व्यक्तीमत्व आहेत.
प्रतिलिपीवर दोन वषाॅपासुन लिहिता लिहिता माझी व रंजुजीची समिक्षाच्या माध्यमातून व लेखनाच्या माध्यमातून ओळख झाली. पाहता पाहता. त्या नागपुरच्या आहेत व "लोकांची मुलींची शाळा, नागपुर " इथे त्यांचे शिक्षण झाले हे कळले. आनंद माझा द्विगुणित झाला.
कारण" लोकांची मुलींची शाळा " इथे माझ्या दोन्ही बहिणीचे शिक्षण झाले. लोकांची शाळा म्हटले तर पंधरा मिनिट अंतरावर असलेली शाळा. याचा मला खूप आनंद झाला.
माझी मग मनातील इच्छा रंजुजी व त्यांच्या कुटुंबीयांना झाली.
असेच मग एकदा समिक्षेतुन त्यांना फोन नंबर विचारला व वार्तालाप करुन पत्ता विचारला.
तसा मी एकाएकी कुणाकडे जात नाही, नागपुरात एवढे सारे नातेवाईक आहे मित्र आहेत ,परिचित आहेत परंतु मी जास्त कधी त्यांच्याशी तरी घरी जाऊन भेट घेतली नाही.
परंतु का कुणास ठाऊक रंजू जी यांना एकदा तरी भेटून त्यांच्याशी संवाद साधावा असे मला मनोमन वाटले .त्यानंतर मी आज उद्या जातो जातो म्हणुन, दोन महिन्यानंतर त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या घरी गेलो.अगदीच माझ्या घराजवळ जगनाडे चौकात व्यंकटेश नगर येथे त्यांचे वास्तव्य आहे. घरी गेल्यानंतर त्यांच्याशी व त्यांच्या मिस्टरांची वार्तालाप केल्यानंतर दोन ते तीन तास कसे गेले हे मला कळले नाही.
एकदम मला घरच्या सारखे वाटले , उदय राव परुळकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर असे वाटले, जसे काही ते माझे जुने मित्र असावे. सरळ मनाचे गमतीशीर बोलणारे समोरच्या व्यक्ती सोबत उत्साहाने विचारपूस करणारे ,विनोदी स्वभावाचे असे उदयराज परुळकर सरांना मी अनुभवले.जश्या व्यक्तिमत्वाचे ते वाटले .
तशी त्यांच्यासोबत जेवढी चर्चा करावी तेवढी कमीच आहे, सकाळी बसलो आणि संध्याकाळ झाली वेळ कसा निघाला मलाच माझे कळले नाही बोलता-बोलता त्यांनी मला एवढे आपलेसे केले की,पुढल्या वेळेस आपली कन्या व मिसेस सोबतच घेऊन या, असे ते व रंजुजी म्हणाल्या. या दोघांच्याही मनात माझ्या व माझ्या कुटुंबाबद्दल खुप आत्मियता वाटली. अगदी आनंदमय स्वभावात त्यांच्यासोबत चर्चा झाली ,अशा पद्धतीची चर्चा रंगली व संध्याकाळी कधी झाली कळले नाही.मी घरी निघायला गेलो तर परुळकरजी व रंजुजीचा चेहरा खिन्न झाला.
पुन्हा कधीतरी परत भेटावे असे म्हणून मी त्यांचा त्या दिवशी निरोप घेतला, मला वाटले त्यानंतर परत एकदा त्यांच्यासोबत भेट घ्यावी. आणि लगेचच काही कारणास्तव त्या भागात गेलो असता त्यांची भेट घेतली अगदी उत्तम व्यक्तिमत्व असलेले उदयराव परुळकर ह्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध जुडले.
🙏🙏🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🎊🎊🍫
परुळकर कुटुंब
परुळकर कुटुंबाशी संवाद साधण्याची संधी फक्त रंजूताई परुळकर व उदयराव परुळकर यांच्याशीच मला मिळाली. परुळकर कुटुंब हे एका प्रतिभावंत व साहित्यिकांचे कुटुंब आहे.
उदयराव परुळकर
उदय राव परुळकर हे कुटुंबाचे आधारस्तंभ ! उत्तम समिक्षक, वाचक व साहित्याचे जाण असलेले व्यक्तीमत्व.
रंजुजी परुळकर
रंजुजी परुळकर ह्यांच्या बद्दल काय सांगावे. प्रतिलिपीवर "चारोळी क्विन" "चारोळी एक्स्प्रेस " म्हणुन प्रसिद्धीच्या झोतात आहेत.
प्रतिलिपीवर, काव्यपुष्प समुहात त्यांचे लिहलेले साहित्य चारोळ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चारोळिची संख्या प्रतिलिपीवर ३५०० च्या घरात आहे. त्यांच्या साहित्यातुनच नेहमीच सामाजिक, जीवनविषयक, मनोरंजक ,कौटुंबिक साहित्याचा उलगडा होतो.
त्या नेहमीच आपल्या कुटूंबातील सदस्याप्रतीचे प्रेम आपल्या चारोळितुन दर्शवतात.

मुलगा अमेय( बंटी) ,सुन (आशा) ,नातवंड त्यांचे (ब्रम्हा, विष्णु, महेश ) I.e. अबिर,अमनी अमायरा.याबद्दल त्या नेहमीच आपल्या साहित्यातुन कोड कौतुक करतात.

मुलगा अमेय(बंटी)
मुलगा अमेय हा सुध्दा प्रतिलिपीवर लिखाण करतो, त्याच्या उत्कृष्ट कविता व लेख प्रतिलिपीवर प्रसिद्ध आहे.
नुकतीच त्याची युट्यूब वर" एहसास "नावाची देशभक्तीची व सामाजिकतेवर प्रकाश टाकणारी कविता मी ऐकली , वाचुन व ऐकुन मी दंगच राहिलो.काय प्रतिभाशैली त्याला त्याच्या आईसारखी लाभलेली आहे.
खुप छान अभिव्यक्ती त्याने कवितेतून व्यक्त केली, सादरीकरण व संवाद उत्तम होते.
अमेयचे तीनही अपत्य मस्त खोडकर आहेत. अबिर,अमनी,व अमायराची जेवढी तारिफ करावी तेवढी कमीच आहे. तसेच सुन आशा तर रंजुजी व उदयराव यांना सदैव मुलीचेच प्रेम देत आली.
मुलगी,जावई व नातवंड
मुलगी प्रिती निलदावार ही सुध्दा प्रतिलिपीवर लेखिका व कवियत्री आहे. प्रतिलिपीवर त्यांच्या उत्तम कविता प्रसिद्ध आहे. परुळकर परिवाराची शान असलेली प्रितीताई निलदावार पूर्वाश्रमीची मिस.नागपुर या किताबाने गौरवान्वीत केलेली कन्या आहे, ती परुळकर व निलदावार या दोन्ही घराण्याची शान आहे.
जावई श्री. अनिरुद्ध निलदावार मिलनसार व्यक्तीमत्व आहे.
नातवंड
अबिराम व रिमझिम
परुळकर परिवाराचा लाड व गोकुळ आहे.

असे हे साहित्यिक क्षेत्रातील कुटुंब व त्यांचे साहित्यातील मोलाचे स्थान पाहुनच मी गदगदून गेलो.
परुळकर परिवाराचे आधारस्तंभ उदयराव परुळकर यांच्या आज वाढदिवसानिमित्त संपुर्ण परिवारास मनातुन हार्दिक शुभेच्छा.


मोहन सोमलकर व परिवाराकडुन श्री. उदयराव परुळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
खूप खूप छान लिहिलंय मोहनजी 👏👏
उत्तर द्याहटवामी तुमची खूप आभारी आहे 🙏🙏
धन्यवाद रंजुजी
हटवामोहनदा छान लिहिलय
उत्तर द्याहटवाव्वाऽ
उत्तर द्याहटवाछान लिखाण 👌
खूप खूप शुभेच्छा
उदयजी तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏