विषय:- माणुसकी दाखविली (लघुकथा)वास्तव
माणुसकी दाखविली
उमेश सदन घरचा भरल्या कुटुंबात राहणारा एक व्यक्ती होता. नवराबायको एक मुलगा एक मुलगी उमेशचे आईवडील ,परत त्याचा मोठा भाऊ ,त्याचा परिवार मुले बाळे असे एकाच घरी राहायचे.
उमेशचे किराण्याचे दुकान होते. रोजच तो आणि त्याचे वडिल किराणा दुकानात राब राब राबून कुटुंबासाठी कष्ट करायचे. त्याचा मोठा भाऊ खाजगी नौकरीत होता. तो त्याच घरी वेगळा राहायचा,पण पारवारिक कार्यक्रम प्रसंगी सगळेच एकत्र यायचे.
अशातच मागल्या वर्षी सार्या देशात भयंकर कहर केला होता.
तसा नागपुर शहरातही कोरोना या महामारीचा खुपच कहर होता.
मोठमोठी खाजगी व सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरलेली होती. नागपुर शहरी एवढे इस्पितळ आहेत, पण एकही इस्पितळ एप्रिल महिन्यात खाली नव्हते.
रोजच किराणा दुकानात गिर्हाईकांशी उमेश चा व त्यांच्या वडिलांचा संपर्क येत असल्यामुळेच आधी उमेश कोरोना पॉझिटिव्ह झाला. तो पंधरा दिवस रुग्णालयात भरती होता.
हिमंतीने पुर्ण खचला होता, पैसे खाजगी इस्पितळात भरती असल्यामुळेच भरपूर लागत होते, पण त्याने हिम्मत हारली नाही. विशेष म्हणजे त्याच्या वस्तीतील मित्रांनी या वेळेस खरी माणुसकी दाखविली ,त्याला हिम्मत दिली. त्याच्या पाठीशी उभे राहीले.
पैश्याची थोडीफार मदत मित्रांनी केली. तो सुधरला होता. सोळाव्या दिवशी मित्र जेव्हा इस्पितळात त्याला आणायला गेले ,तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रु आले.
उमेश सुधारला पण अशक्त झाला होता. मित्र दोन त्याच्या जवळ त्याला आधार द्यायला गेले. तर उमेश म्हणाला," अरे.... मला तर कोरोना झाला होता ,तुम्ही हात लावु नका...! माझ्या दुर रहा..! तेव्हा मित्र त्याला म्हणाले , सोड यार मैत्रीसमोर काही बिमारी नाही." तुला काही झाले नाही, आणि आम्हालाही काही होणार नाही, दोन्ही मित्रांनी त्याला खांदा देऊन बगलेत पकडले व गाडित बसविले. व घरी आणले.
काही दिवसांनी उमेश चे आईवडील दोघेही पॉझिटिव्ह निघाले, दोघांनाही खाजगी रुग्णालयात भरती केले. पुन्हा पैश्याची जुळवाजुळव सुरु झाली.
बाबा मनाने व तनाने धडधाकट होते, त्यांनी आलेले संकट सहन केले. आई मात्र नऊ लाख लागूनही वाचु शकली नाही.
उमेश ची आई कोरोनामुळे देवाघरी गेली, तिला शुगर व बिपीचा त्रास होता.
याही वेळेस मित्रांनी माणुसकी दाखविली आपल्या जवळील कोणी पन्नास हजार ,तर कोणी एक लाख देऊन या संकटाच्या वेळी मदत करुन माणुसकी दाखविली...!
माणसाची वेळेवर कामात आलेली मदत हिच खरी माणुसकी..!
मोहन सोमलकर
नागपुर ✍✍✍🙏🙏📥
वेळप्रसंगी माणुसकी जे दाखवतात तेच खरे हितचिंतक असतात.कोरोना काळात खरी जाण कळली. मित्र असावे तर असे खूप सुंदर लिहले
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद माधुरीमॅम
हटवाखुपच छान लिहीलय मोहन दा 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद दा
हटवावेळच अशी येते आणि
उत्तर द्याहटवाअशा वेळी राजाही रंक होतो.
असे एकच नाही तर अगणीत कुटुंबातील धडधाकट व्यक्तींना आपले जीव गमवावे लागले.
आजही ते दृष्य आठवतात डोळे पाणावले जातात.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आबा
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
हटवामाणुसकीचे उत्तम उदाहरण 👏👏👏
उत्तर द्याहटवाकरोनाने सर्वांचे खूपच नुकसान केले.
उत्तर द्याहटवाघरेच्या घरे उद्ध्वस्त झाली