मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

पवित्र बंधन

॥ रेशीमगाठ ॥

 पवित्र बंधन ते नाते जीवाभावाचे   

स्नेहाच्या व आपुलकीच्या धाग्यात गुंतलेले

हा गुंता कधीही निघत नाही 

नाते कधी तुटूत नाही,मनी रुजलेले..॥१॥


भाव मनाचा बहिणीसाठी 

ह्दयातूनि रिता होतो,मनाच्या कोपर्‍यात साचतो

डोळ्यात असतो साचलेला,

दुःख झालेले असो, वा सुख...

अश्रु वाटे त्यावेळी तो ओघळलेला.!२॥


बहिण रक्ताच्या नात्यातली असो

वा असो मनाच्या नात्यातली 

भावना तिच्या तेवढ्याच पारदशॅक असे...

जेवढं ओघाने वाहणाऱ  नदीचे पाणी..॥३॥


हा अमूल्य ठेवा नेहमी जपावा

ह्दयातला एक तरी कोपरा !

ठेवावा रिकामा नेहमी

जशी आकाशाच्या प्रेमासाठी ठेवते धरा..॥४॥


मोहन सोमलकर 🌿🔥🌿


९ टिप्पण्या:

  1. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    गणेश शिवाजी दळवी 🙏🏼

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...