| My gallery |
सतिश एक शांत मृदु स्वभावाचा
लाभला हिरा जणु काव्यपुष्पला
गर्व करण्यापद आहे, आहे मौल्यवान तो
त्याला पण अहंकार नाही गुणाच्या आपल्या !
स्तुतीसुमन उधळावे जेव्हा जेव्हा
म्हणतो तो अजुन खुप शिकायचे
आताच तर पाऊल टाकले शर्यतीत
मला अजुन पुढे आहे धावायचे....!
काय दाद द्यावी अशा कलावंताला
आभाळ ठेंगणे पडावे त्याची महती गायाला
शिल्पकार तर तो आहेच खरा
पण खरा माणुसही आहे पटला माझ्या मनाला!
आज त्याने एवढ्या दिवसानंतर
आपल्या हातानी बनविलेले शिल्प दाखविले
अहो शिल्पकारच तर आहे तो
मुर्तिमंत रुप जिवंत शिल्पात साकारले.!
या शिल्पकाराला माझे कर जुळती
खुप पुढे प्रगती होवो.!
तो शिल्प छान घडवो.!
मोहन सोमलकर
शुभेछुक
🙏🙏🙏🙏🙏
सुंदर रचना केली दादा 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई
हटवाखरच सतीश खरे हरहुन्नरी कलाकार आहे...खूप छान रचना साकारून प्रोत्साहन दिलं मोहनजी.👌✍️👍💐💐🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मानसीमॅम
हटवाखुपच सुंदर भावनिक झालो sir मी वाचून खूपच अप्रतिम लिहले
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतिश, खुप सुंदर कलाकृती साकार केली तु
हटवाअतिशय सुंदर रचना केली आहे. खरंच त्यांच्या कला म्हणजे जिवंतपणाच त्या मूर्तीला...
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद माधुरीमॅम
हटवाखुप छान रचना केली.... 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप धन्यवाद अश्विनीताई
हटवामोहनजी
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना आणि छान शब्दात सतीशला गौरवण्यात आले आहे.त्याची कलाकृती बघण्या सारखीच आहे.
तुम्हाला आणि सतीश ला
खूप खूप शुभेच्छा..!
यशवंत होई सदा
🌺🌷🌺🌷🌺🌷🌺
आबा
🙏
धन्यवाद आबा
हटवाअगदी खरं मोहनदादा...मी ही फोट़ पाहीले आहेत सतीशजींच्या कलाकृतींचे...अगदी जीवंत शिल्प साकारतात सतीश जी...कवीताही तितकीच ऊत्कृष्ट लिहीतात.
उत्तर द्याहटवाखपण खुपच सुंदर शब्दांत ,सतीशजींच स्तुतीगान केल आहे, मोहनदादा...👏👏👏💐💐💐🍫🍫🍫
धन्यवाद वैशुताई
हटवाकिती सुंदर लिहिलंय सर👏🏼👏🏼🍧सतीश
उत्तर द्याहटवाआहेच गुणी कलाकार 🙏🏼
धन्यवाद रंजुजी
हटवा